शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा

By admin | Updated: October 26, 2015 01:14 IST

राज्यातील सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील पिकांची हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आलेल्या १४,७०८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती ...

मुख्यमंत्र्यांना पत्र : वडेट्टीवार यांची मागणीचंद्रपूर: राज्यातील सन २०१५-१६ च्या खरीप हंगामातील पिकांची हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आलेल्या १४,७०८ गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती राज्य शासनाने २० आॅक्टोबर रोजी जाहीर केली. त्याप्रमाणे अध्यादेश काढलेला आहे. त्यात चंद्रपूर जिल्ह्याला पूर्णत: वगळलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी करुनसुद्धा पाण्याअभावी धान, सोयाबिन, कापूस यासारखे पीक उद्ध्वस्त झाले आहे. शेतामध्ये जे काही पीक उभे आहेत, त्यामधून ५० टक्क्यापेक्षाही कमी उत्पादन होणार असल्याने आर्थिक परिस्थिती अभावी शेतकरी हवालदिल होणार आहे. केंद्र आणि राज्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दोन मंत्री असताना सुद्धाराज्य शासनाने दुष्काळसदृश परिस्थितीमधून चंद्रपूर जिल्ह्याला वगळलेले असून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करुन सरसकट प्रती हेक्टर २० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अन्यथा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून आंदोलन केले जाईल, असा इशारा काँग्रेस पक्षाचे उपगट नेता तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. सुरुवातीला चांगल्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची सुरुवात केली. परंतु नंतर वेळोवेळी कधी जास्त तर कधी कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार आणि तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे हजारो हेक्टर शेतातील पिके उद्धवस्त झालीत तर काही पिके शेतामध्ये उभे असून त्या पिकांची वाढसुद्धा बरोबर झालेली नाही. पिकांची परिस्थितीसुद्धा पोटरी, फुलोरा व लोबी अवस्थेत असून सदर पिकावर तुडतुडे, खोडकिडा, कडाकरपा, पाने गुंडाळणारी अळी व लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे धान, सोयाबिन, कापूस पिकांचे उत्पादन ५० टक्क्याच्यावर होणार किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. (प्रतिनिधी)