शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

कत्तलखान्यात जाणारी जनावरे पकडली

By admin | Updated: September 5, 2015 01:05 IST

जनावरांची विक्री करून कत्तलखान्यात नेत असताना पोलिसांनी दोघांना अटक केली. या कारवाईत १० जनावरांची मुक्तता करण्यात आली आहे.

दोघांना अटक : १० जनावरे कोंडवाड्यात, मेंडकी पोलिसांची कारवाईमेंडकी : जनावरांची विक्री करून कत्तलखान्यात नेत असताना पोलिसांनी दोघांना अटक केली. या कारवाईत १० जनावरांची मुक्तता करण्यात आली आहे. ही कारवाई मेंडकी उपपोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी पहाटे केली.नवेगाव (खुर्द) येथून पहाटेच्या सुमारास एम.एच. २७ एक्स ७६७९ या चारचाकी वाहनाने जनावरांना परप्रांतातील कत्तल खान्यात नेत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. मेंंडकी पोलिसांनी सापडा रचून वाहनाला अडविले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात १० जनावरे आढळून आलेत. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. चालक शमशेर जहरुद्दीन सैय्यद (२०) रा. पवनी व किल्नर शेख सुलतान अब्दुल हबीब शेख (२०) रा. भिवापूर जि. नागपूर या दोघांना अटक करून जनावरे व वाहन ताब्यात घेतले.मेंडकी येथील उपपोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र एस. खैरकर पोलीस ताफ्यासह मेंडकी येथे गस्त घालीत असताना नवेगाववर (खुर्द) येथून चारचाकी वाहन जनावरांना घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक रविंद्र खैरकर, पोलीस हवालदार युवराज जगताप, तानुजी रायपुरे, राजेंद्र जुमनाके यांनी मेंडकी येथील बस स्थानकावर सापडा रचून नाकेबंदी केली. आरोपींकडून १० गायी व वाहन असे चार लाख १७ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जनावरांना मेंडकी येथील कोंडवाड्यात टाकण्यात आले असून प्रकरणाचा तपास मेंडकी पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)