शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
6
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
7
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
8
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
9
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
10
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
11
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
12
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
13
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
14
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
15
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
16
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
17
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
18
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
19
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
20
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!

चंद्रपूरकरांच्या जलपूर्तीसाठी ‘अमृत ’ योजना

By admin | Updated: May 27, 2016 01:10 IST

शहराची वाढलेली लोकसंख्या आणि त्या तुलनेत पाणी पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून भविष्यातील

आज नागपुरात बैठक : उर्जामंत्र्यांपुढे मांडणार आराखडाचंद्रपूर : शहराची वाढलेली लोकसंख्या आणि त्या तुलनेत पाणी पुरवठ्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून भविष्यातील पेयजलाच्या नियोजनासाठी अमृत योजना तयार करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे आमदार नाना श्यामकुळे यांनी यात पुढाकार घेवून बुधवारी जलसंपदा मंत्री चंद्रपुरात आले असता ही योजना त्यांनी आग्रहाने मांडली आणि मंजुरीही मिळवून घेतली आहे. असे असले तरी ज्या ईरई धरणातून चंद्रपूरकरांसाठी पाणी घेतले जाते ते धरण उर्जा विभागाच्या अखत्यारित येत असल्याने या अमृत योजनेपुढे पेच ठाकला आहे. त्यावर मात करण्यासाठी आणि उपाय शोधण्यासाठी शुक्रवारी नागपुरात उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीत या योजनेसंदर्भातील आराखडा ठेवला जाणार आहे.चंद्रपूरकरांसाठी ईरइ धरण हेच पाण्याचे एकमेव स्त्रोत आहे. उर्जा विभागाने यातील अधिकचा जलसाठा चंद्रपूरसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला नाही तर शहरावर मोठे जलसंकट ओढावू शकते. हे लक्षात घेवूनच भविष्यात २०४८ या वर्षी असणारी चंद्रपूर शहराची लोकसंख्या गृहित धरून ‘अमृत योजना’ तयार करण्यात आली आहे. २०४८ मध्ये गृहित धरलेल्या ५ लाख ३३ हजार ७७७ लोकसंख्येच्या हिशेबाने वर्षाला ३२ क्युबिक मिटर पाणी आरक्षित करण्याची गरज आहे. सध्याच्या आरक्षित पाण्यापेक्षा ते १६.३२ ने अधिक असणार आहे. या विषयावर २७ मे रोजी नागपुरात उर्जामंत्र्यांसोबत महापौर राखी कंचर्लावार आणि मनपाचे आयुक्त सुधीर शंभरकर यांची बैठक होत आहे. यात आराखडा सादर करून मान्यतेसाठी विनंती केली जाणार आहे. राज्याचे उर्जामंत्री काय निर्णय घेतात, हे आता महत्वाचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी) जलसंपदा मंत्र्यांची मंजुरी२५ मे रोजी चंद्रपुरात झालेल्या बैठकीमध्ये जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. चंद्रपूर शहराचे मुख्य जलस्त्रोत ईरई नदी असल्याने या शहरासाठी भविष्यातील पेयजलाच्या तरतुदीची नैतिक जबाबदारीही उर्जाविभागाची आहे, असा दावा करण्यात आला आहे.सिवरेज ट्रिटमेंट प्लँटमधील पाणी वापराचा सीटीपीएसपुढे पर्यायचंद्रपूरकरांना अधिकचे पाणी मिळावे यासाठी उपाय योजण्याची गरज आहे. हे लक्षात घेवून चंद्रपुरातील दोन्ही सिवरेज ट्रिटमेंट प्लँटमधील पाणी शुद्ध करून सीटीपीएसकरिता वापराला देण्याचा पर्याय पुढे आला आहे. मनपाच्या आयुक्तांनी महाऔष्णिक वीज केंद्राच्या मुख्य अभियंत्यांना या संदर्भात पत्र लिहिले असून तसा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे ईरइ धरणावरील पाण्याचा कितीतरी भार वाचू शकेल, असा पर्याय आहे. नागपूर मनपाच्या धर्तीवर सीटीपीएसने चंद्रपूर मनपासोबत करार केल्यास हे शक्य होईल, असे या प्रस्तावात म्हटले आहे. ४५ एमएलडी क्षमतेचा पठानपुरा सिवेज ट्रीटमेंट प्लँट सप्टेंबर-२०१६ पर्यंत तर, ७० एमएलडी क्षमतेचा रहमतनगर सिवेज ट्रीटमेंट प्लँट आॅक्टोबर-२०१६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.