शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

खापरी(डोमा) येथे आंबेडकरी लोककला महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:22 IST

प्रबोधन कला परिवर्तन मंच, पंचशील प्रबोधिनी भजन कला मंडळ, प्रबुद्ध प्रबोधिनी भजन कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खापरी(डोमा) येथे ...

प्रबोधन कला परिवर्तन मंच, पंचशील प्रबोधिनी भजन कला मंडळ, प्रबुद्ध प्रबोधिनी भजन कला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने खापरी(डोमा) येथे आंबेडकरी लोककला महोत्सवाचे आयोजन २१ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी व लेखक ॲड. भूपेशकुमार पाटील हे राहतील. उद्घाटक म्हणून प्रा. पुष्पा घोडके उपस्थित राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. अनमोल शेंडे, प्रा. प्रवीण कांबळे, डॉ. सुनंदा रामटेके, विदर्भ कलाकार परिषदेचे अध्यक्ष धर्मदास भिवगडे उपस्थित राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून लोकनाथ शेंडे हे उपस्थित राहणार आहेत.

या लोककला महोत्सवात कवी सुरेश डांगे यांच्या अध्यक्षतेत निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. समारोप ॲड. भूपेशकुमार पाटील यांचे अध्यक्षतेखाली होईल. प्रमुख अतिथी चंद्रपूर जि. प. विरोधी गटनेते डॉ. सतीश वारजुकर, समाजकल्याण सभापती नागराज गेडाम, चिमूर पं. स. सभापती लता पिसे, नागभीड पं. स. सभापती प्रणया गड्डमवार, उपसभापती रोशन ढोक,सामाजिक कार्यकर्ते विनोद गजघाटे,प्रवीण सातपुते, हेमलता शेंडे उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात भीम-बुद्ध गीतांचा कार्यक्रम ‘निळी पाखरं’ होणार आहे. तसेच विविध क्षेत्रांत कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांचा वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठाणकडून सत्कार करण्यात येणार आहे.