शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ही तर मासोळ्यांची सामूहिक आत्महत्याच

By admin | Updated: January 5, 2016 01:29 IST

वर्धा नदीच्या पात्रात बिल्ट पेपर उद्योगाने रसायनयुक्त पाणी सोडल्याने सास्ती-बल्लारपूर परिसरातील मोठ्या प्रमाणात

सास्ती : वर्धा नदीच्या पात्रात बिल्ट पेपर उद्योगाने रसायनयुक्त पाणी सोडल्याने सास्ती-बल्लारपूर परिसरातील मोठ्या प्रमाणात मासे व इतर जलचर प्राणी मृत झाल्याची घटना १२-१३ नोव्हेंबरला घडली. या संदर्भात तक्रारीही झाल्या. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर ३-४ दिवसानंतर म्हणजे १६ नोव्हेंबरला प्रदूषण मंडळाकडून चौकशी करण्यात आली व पालकमंत्र्यांना अहवालही दिल्या गेला. त्यात मात्र रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी कारखान्यातून सोडल्या जात नाही तर मासेही मृत झाले नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चौकशीवर आक्षेप दर्शवित बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश खरबडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला खुले पत्र लिहीले.बिल्ट पेपर उद्योगातील रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी वर्धा नदीत सोडल्यामुळे १२-१३ नोव्हेंबर रोजी शेकडो मासोळ्यांचा मृत्यू झाला तर हजारो जलचर प्राणी मृत्यूच्या छायेत होते. त्यासंदर्भात ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच काही नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर घटनेची चौकशी ३-४ दिवसानंतर केली. त्याचा अहवाल पालकमंत्र्यांना पाठविला. परंतु सदर अहवाल पूर्णपणे कारखान्याची पाठराखण करणारा व पालकमंत्र्यांची दिशाभूल करणारा वाटत असल्याने बल्लारपूर येथील निलेश खरबडे यांनी खुले पत्र लिहून चौकशीवर आक्षेप नोंदविला.घटनेच्या ३-४ दिवसानंतर मृत मासे नदीत आपले वाट पाहतील, अशी अपेक्षा प्रदूषण मंडळाची असावी. घटनेचे वृत्त वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यावरही सदर उद्योग समुह त्यांच्या चुकीचे प्रमाण मागे सोडतील, असे ही प्रदूषण मंडळाला वाटल्याचे दिसते. शेवटी याबाबत आपला निष्कर्ष खराच असणार. कारण आपण या विषयाचे जाणकार तज्ज्ञ आहात. याबाबत अंकुश ठेवणारे अधिकारीसुद्धा आहात. आम्हा सामान्य नागरिकांच्या ज्ञानाप्रमाणे कारखान्यातील रासायनिक सांडपाण्याने ही घटना घडली असावी, असा आमचा गैरसमज झाला. या गैरसमाजापोटी नाहक आपल्या विभागास पाहणीचे कष्ट करावे लागले. यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. राहीला प्रश्न मेलेल्या माश्यांचा तर त्यांनी सामुहिकरित्या आत्महत्याच केली असावी, असे समजण्यास हरकत नसल्याचे निलेश पांडरंग खरबडे यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाला लिहीलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे.प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालावर अनेकांनी आक्षेप नोंदवित केलेल्या चौकशीची फेरचौकशी करून त्यात दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)