शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी नगर पालिकेत आरोप-प्रत्यारोप

By admin | Updated: July 15, 2015 01:13 IST

तालुक्यात पाऊसाची सर्वानांच प्रतिक्षा आहे. गेल्या १५ ते २० दिवसापासून पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच जण पावसाची डोळे लावून वाट पाहत आहेत.

विकास कामांकडे दुर्लक्ष : युतीचा वाद चव्हाट्यावरब्रह्मपुरी : तालुक्यात पाऊसाची सर्वानांच प्रतिक्षा आहे. गेल्या १५ ते २० दिवसापासून पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांसह सर्वच जण पावसाची डोळे लावून वाट पाहत आहेत. पण ब्रह्मपुरीच्या नगरपालिकेत मात्र आरोप -प्रत्यारोपाचा पाऊस गेल्या आठ दिवसांपासून सुरु असल्याने ब्रह्मपुरीची जनता ऱ्हाऊन निघाली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.येथील नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे १०, स्वतंत्रविकास आघाडीचे ९ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे १ असे पक्षीय बलाबल आहे. सत्ता स्थापत करताना भारतीय जनता पार्टी व स्वतंत्र विकास आघाडीची युती होऊन विरोधी पक्ष संपुष्ठात आणल्या गेले. जनतेला या निर्णयाचे मोठे कौतुक वाटायला लागले व विकासाच्या अपेक्षाही भोळी जनता मनात ठेवू लागली. सत्ता स्थापनेनंतर काही काळ गुण्यागोविंदाने गेली. परंतु अचानकच कुठे माशी शिकंली हे कळेनासे झाले व आरोप प्रत्यारोपांचा ऐन पावसाळ्यातच पाऊस पडत असल्याने नागरिक ओले चिंब झाले आहेत. पाच प्रभागापैकी लॉटरी लागावी असे एकाच पक्षाचे उमेदवार प्रभाग १, २ व ३ मध्ये निवडणून आले. व विकास निधी या मुद्द्यावरुन आरोप- प्रत्यारोप सुरु झाले. सभागृहातील मुद्दे बाहेर येऊ लागल्याने जनतेला धक्के बसू लागले आहे. कारण २० वर्षाच्या पालिकेच्या इतिहासात असे झाले नाही. त्यामुळे जनतेला नवीन प्रकार पाहावयास मिळत आहे. जनता विकासासाठी आसुसलेली आहे. जनतेला या आरोपांचे काहीच देणे घेणे नाही. परंतु नगरपरिषदेची वाहवा अशा माध्यामातून वाढण्याऐवजी खालावत जाण्याचा प्रकार होऊ शकतो, हे सर्वानी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीच गुंठेवारी प्रकरणाने नगर परिषदेची पत गेली आहे आणि पुन्हा या वादाच्या पावसाने पालिका धूऊन निघत असल्याने जनतेने कोणाला न्याय मागावा, हा मोठा प्रश्न आहे. विकासाच्या कामात सर्वानी हातभार लावण्यामध्ये ब्रह्मपुरीकर मागे नाही. तेवढी मानसिकता आजही जिवंत आहे. मात्र चूक कोणाची व बरोबर कोणाचे हे पाहिले जात नाही. तरीपण असे का होत आहे, असा गहन प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे. सत्ता स्थापनेवेळी जे ठरले असेल त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. त्यासाठी तडजोड महत्वाची आहे. त्या तडजोडीला मोठी तडा आरोप प्रत्यारोपांच्या माध्यमातून झाली तर जनतेची स्वप्ने भंग होतील व पुन्हा जनतेला मते मागताना उत्तरे देता येणार नाही. (प्रतिनिधी)