शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

एसबीआयचे तिन्ही अधिकारी न्यायालयीन कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 05:00 IST

आधीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११ कर्जदार अन् एका एजंटने जामिनासाठी अर्ज केला असून, यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील फरार चार अधिकाऱ्यांच्या शोधार्थ मुंबई व नागपूरला गेलेले पोलीस पथक रिकाम्या हाताने परत आले आहेत. तीन वर्षांपासून भारतीय स्टेट बँकेत शहरातील नामांकित बिल्डरांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून गृहकर्जात १४ कोटी २६ लाखांची बँकेची फसवणूक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  भारतीय स्टेट बँकेच्या(एसबीआय) १४ कोटी २६ लाख रुपयांच्या गृहकर्ज फसवणूक प्रकरणी अटकेतील बँकेच्या तीनही अधिकाऱ्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले होते. पोलीस कोठडी संपल्याने तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. आधीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या ११ कर्जदार अन् एका एजंटने जामिनासाठी अर्ज केला असून, यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील फरार चार अधिकाऱ्यांच्या शोधार्थ मुंबई व नागपूरला गेलेले पोलीस पथक रिकाम्या हाताने परत आले आहेत. तीन वर्षांपासून भारतीय स्टेट बँकेत शहरातील नामांकित बिल्डरांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून गृहकर्जात १४ कोटी २६ लाखांची बँकेची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने २३ व २४ फेब्रुवारी रोजी एजंटसह १२ कर्जधारकांना अटक केल्यानंतर खळबळ उडाली. दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी बँकेचे व्यवस्थापक पंकजसिंग सोळंकी, व्यवस्थापक विनोद लाटेलवार, मुख्य क्रेडिट व्यवस्थापक देवीदास कुळकर्णी या तिघांना अटक केली. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती.                         कागदपत्रांची पडताळणी सुरूअधिक गृहकर्ज मिळविण्यासाठी कर्जदारांनी बँकेचे अधिकारी व एजंटसह हातमिळवणी करून बनावट आयकर कागदपत्रे सादर करून भारतीय स्टेट बँकेला १४ कोटी २६ लाखांनी गंडविले. साधारणत: ४४ कर्जदारांच्या प्रकरणात बनावट आयकर कागदपत्रे असल्याची तक्रार क्षेत्रीय व्यवस्थापकांनी केली होती. त्या आधारावर कर्ज प्रकरणातील कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे पुन्हा आरोपी वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.

बिल्डर्स लाॅबी हादरलीएखाद्या ग्राहकाला फ्लॅट विकण्यासाठी जादाचे कर्ज मिळवून देण्यासाठी बिल्डरांच्या माध्यमातून बँकेच्या अधिकाऱ्यांशी साठगाठ झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास केल्यास चंद्रपुरातील नामांकित बिल्डर्स यामध्ये अडकण्याची शक्यता आहे. हा गृहकर्ज घोटाळा उघडकीस येताच बिल्डर्स लाॅबी हादरल्याचे दिसून येते. 

 

 

टॅग्स :SBIएसबीआयfraudधोकेबाजी