शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत

By admin | Updated: April 17, 2016 00:36 IST

विद्युत कंपनीमध्ये काम करणाऱ्या तांत्रिक कामगारांचे प्रश्न व मागण्या न्याय्य असून त्या सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही ...

सुधीर मुनगंटीवार : तांत्रिक कामगार युनियनचा मेळावाचंद्रपूर : विद्युत कंपनीमध्ये काम करणाऱ्या तांत्रिक कामगारांचे प्रश्न व मागण्या न्याय्य असून त्या सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. दाताळा रोडवरील लॉनमध्ये आयोजित विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात शनिवारी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनियनचे केंद्रीय अध्यक्ष विष्णुस्वरुप पाटील हे होते. चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता राजू बुरडे, मुख्य अभियंता दिलीप घुगल, अधिक्षक अभियंता हरिष गजभे, कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार, सरचिटणीस आर.टी. देवकांत, युनियनचे उपाध्यक्ष नारायण सोनवणे, राज्य सचिव संतोष घारगे, केंद्रीय उपसचिव आर.जे.देवरे व रवी बारई आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तांत्रिक कामगारांच्या मागण्या आपण समजून घेतल्या असून या विषयी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. निवृत्ती वेतन आणि कामाचा भार या दोन महत्वाच्या मागण्या असून त्या सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे ते म्हणाले. अटेन्शन रहा, पेन्शन मिळाल्याशिवाय राहणार नाही असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, आजही राज्याच्या अनेक गावात वीज पोहचली नाही. तसेच विजेची गळती मोठया प्रमाणात होताना दिसत आहे. आपण सर्वांनी जबाबदारीने यात लक्ष घालावे.वीज कंपन्यांच्या कार्यालयाची दुरावस्था झाली असून सामान्य माणसाला हे कार्यालय आपले वाटावे, असे निर्माण करा असा सल्ला त्यांनी दिला. वीज कंपन्यांना यावर्षीच्या अर्थसंकल्पात २ हजार ७०० कोटी रुपयांचे अनुदान दिल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.तांत्रिक कामगार युनियनच्या सदस्यांनी जबाबदारीने काम करावे, असे सांगून विष्णुस्वरुप पाटील म्हणाले की, निवृत्ती वेतन, वेतनात समानता, कामगार संरचना व वैद्यकीय सुविधा या तांत्रिक कामगारांच्या महत्वाच्या मागण्या आहेत. या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात असे ते म्हणाले. असे असले तरी सामान्य ग्राहकांना स्वस्त व अखंड वीज पुरवठा मिळण्यासाठी तांत्रिक कामगारांची जबाबदारी मोठी आहे. गावागावांना लागणारा विजेचा डाटा आपल्याकडे असायला हवा, या उद्देशाने काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता राजू बुरडे, मुख्य अभियंता दिलीप घुगल, अधीक्षक अभियंता हरीश गजभे, कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार, सरचिटणीस आर.टी. देवकांत, युनियनचे उपाध्यक्ष नारायण सोनवणे, राज्य सचिव संतोष घारगे, केंद्रीय उपसचिव आर.जे. देवरे व रवी बारई यांची यावेळी भाषणे झालीत. या कार्यक्रमाला विदर्भातील सर्व जिल्हयातील तांत्रिक कामगार युनियनचे पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)