शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही तालुक्यात शेती व्यवसाय धोक्यात

By admin | Updated: December 7, 2014 22:48 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका हा धान उत्पादक तालुका व धानाचे आगार म्हणून ओळखला जातो. मागील तीन वर्षांपासून रासायनिक खते, किटकनाशक औषधे, बी-बियाणे, मजुरीत वाढ झाली आहे.

सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका हा धान उत्पादक तालुका व धानाचे आगार म्हणून ओळखला जातो. मागील तीन वर्षांपासून रासायनिक खते, किटकनाशक औषधे, बी-बियाणे, मजुरीत वाढ झाली आहे. अशातच धानाचे घसरलेले भाव व उत्पादन खर्चात झालेली वाढ, त्यामुळे धान पीक शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. नैसर्गीक आपत्तीमुळे खचलेल्या व आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी चिंतातूर झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने खचलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्येकडे न वळता शेतकऱ्यांत हिंमत यावी यासाठी विविध पॅकेज देण्यात आले. तरीही विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याकरिता शासनाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना शेतमालाला भाव दिला तरत शेतकरी सावरू शकतो, अशी स्थिती आहे. सध्या सिंदेवाही तालुक्यात श्रीराम धानाला एक हजार ९०० रुपये प्रती क्विंटल भाव आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०१३ मध्ये श्रीराम धानाला दोन हजार ५०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. महाराष्ट्र शासनाने धानाला तीन हजार रुपये क्विंटल भाव द्यावे अशी विदर्भातील शेतकऱ्यांची मागणी होती. यावर्षी शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळणारच नाही. परिणामी शेतकरी हतबल होईल. तीन वर्षांमध्ये बियाणे, किटकनाशक औषधी, रासायनिक खताच्या उत्पादन खर्चात तीन पटीने वाढ झाली. अशातच धानाला कमी भाव मिळत असल्यामुळे दरवर्षी शेती व्यवसाय तोट्यात येत आहे. कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी शेतकऱ्यांना गायी-बैल व अंगावरील सोन्याचे दागदागिने विकण्याची पाळी आली आहे. याशिवाय राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, सहकारी सोसायटी, महिला-पुरूष बचत गटाकडून कर्ज काढले आणि धान पिकाची रोवणी केली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाला तलावाचे - नहराचे पाणी मिळाले नाही. याशिवाय निसर्गाने शेतकऱ्यांवर प्रहार करून धान पिकावर खोडकिडा, मावा-तुडतुडा, लष्करी अळी, करपा अशा असंख्य रोगाचा प्रादूर्भाव झाला. रात्रंदिवस मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याने मोठ्या संघर्षातून निसर्गाशी दोन हात करून शेतीत डौलदार धानपिक उभे केले. काही प्रमाणात धानाची मळणी झाली. एकरी २० ते २५ हजारांचा खर्च करून एक हजार ८०० ते एक हजार ९०० रुपये धानाचा भाव पाहून पुन्हा शेतकरी चिंताग्रस्त व हतबल झाला. आता काय करावे, काय नाही. कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत या परिसरातील धान उत्पादक शेतकरी सापडला आहे. शासनाने धानाचे हमी भाव वाढवून द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)