शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मूलमध्ये कृषी सप्ताहानिमित्त कार्यक्रम

By admin | Updated: July 5, 2015 00:51 IST

व्यापक दृष्टिकोनातून केवळ समाज कार्यासाठी संस्काराला रोजगाराची जोड देणारी शिक्षण संस्था स्व.वि.तु. नागापुरे यांनी निर्माण केली.

भरगच्च उपस्थिती : समाजसेवा करणारे विद्यार्थी घडविणारमूल : व्यापक दृष्टिकोनातून केवळ समाज कार्यासाठी संस्काराला रोजगाराची जोड देणारी शिक्षण संस्था स्व.वि.तु. नागापुरे यांनी निर्माण केली. या संस्थेमध्ये शिक्षण घेऊन समाजसेवा करणारे विद्यार्थी यातून घडत आहेत, घडत राहणार आहे. आणि ही संस्था पुढे नेण्याचा संकल्प संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे पूर्ण करीत आहेत, असे विचार गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुर्लीधर चांदेकर यांनी व्यक्त केले.स्व. वि.तु. नागापुरे सामाजिक ्रकार्य व सेवा प्रतिष्ठाणतर्फे कृषी सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद््घाटक म्हणून ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहकार तथा शिक्षण महर्षी संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब वासाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष संजय वासाडे, उपाध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अ‍ॅड. अनिल वैरागडे, सदस्य दि.म. एडलावार, प्राचार्य डॉ. अ.ह. वानखेडे, प्राचार्य डॉ. बसवराज, सदस्य र.सो. पडोळे, ते.क. कापगते, अ‍ॅड. प्रणव वैरागडे आदी उपस्थित होते.स्व. नागपुरे यांनी काढलेल्या संस्थेला ७५ वर्षे पूर्ण झाली असून त्यांचे स्मारक मूलमध्ये उभारण्याचा संकल्प केला आहे. या संस्थेमध्ये पुणे- मुंबईकडे दिले जाणार नवीन अभ्यासक्रमाचे शिक्षण ग्रामीण विद्यार्थ्यांना दिले जाईल, असेही वासाडे यांनी सांगितले. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष संजय वासाडे, उपाध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे यांनी आपले विचार व्यक्त केले तर स्व.वि.तु. नागपुरेजींनी केलेल्या कार्याचा आढावा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अ‍ॅड. अनिल वैरागडे यांनी उपस्थितांसमोर मांडला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. डॉ. अनिता वाळके, प्रा.आर.ए. बुरांडे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)जिवती येथे कार्यक्रमजिवती : वसंंतराव नाईक यांच्या जयंती समारोहनिमित्त पंचायत समिती जीवतीच्या सभागृहात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या कृषी जागृती सप्ताहाचे उद्घाटन संवर्ग विकास अधिकारी संदीप गुडशेलवार यांच्या हस्ते वसंतराव नाईक यांचे प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी राज वानखेडे, विस्तार अधिकारी (कृषी) आर.आर. देशमुख, मंडळ कृषी अधिकारी (प्रभारी) एम.जे. चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते.