शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

समृद्ध किसान योजनेसाठी करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 22:22 IST

शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा ते बांदा योजनेतंर्गत समृद्ध किसान योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात यासंदर्भात टाटा ट्रस्ट, जिल्हा प्रशासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. सोबतच शुक्रवारी झालेल्या १२ तासांच्या मॅराथॉन बैठकीत विकास कामाचा आढावा घेऊन प्रत्येक कामांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.

ठळक मुद्देविकासकामांचा आढावा : पालकमंत्र्यांनी घेतली १२ तासांची मॅराथॉन बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा ते बांदा योजनेतंर्गत समृद्ध किसान योजनेला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात यासंदर्भात टाटा ट्रस्ट, जिल्हा प्रशासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. सोबतच शुक्रवारी झालेल्या १२ तासांच्या मॅराथॉन बैठकीत विकास कामाचा आढावा घेऊन प्रत्येक कामांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली.समृद्ध किसान कार्यक्रम हा पथदर्शी कार्यक्रम सन २०१८-१९ ते २०२०-२१ या तीन वर्षांच्या कालावधीत दोन टप्प्यात राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मूल, पोंभुर्णा व बल्लारपूर हे तीन तालुके, दुसºया टप्प्यात नागभीड, गोंडपिपरी, जिवती तालुक्यात राबविला जाईल. सदर कार्यक्रमामुळे शेतकºयांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित आजच्या बैठकीमध्ये आमदार नाना श्यामकुळे, अ‍ॅड. संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, आयुक्त संजय काकडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, मनपा सभापती राहुल पावडे उपस्थित होते. या योजनेअंतर्गत सुक्ष्म सिंचन, पॉली हाऊस नर्सरी, भाजीपाला लागवड, कृषी यांत्रिकीकरण, समूह सिंचन, सिंचन विहिरीची दुरुस्ती, उपसा सिंचन योजना, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, आदी नावीन्यपूर्ण कामे हाती घेण्यात येणार आहे.आज आढावा घेण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने कृषी, सार्वजनिक बांधकाम विभाग, शेतकरी कर्जमाफी, पाणीटंचाई, जयपूर येथील प्रस्तावित शेतकरी वेल्फेअर ट्रस्टमार्फत राबविण्यात येणारी कामे, जिल्ह्यातील ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाची सद्यस्थिती, विविध योजनांची माहिती, समृद्ध किसान योजना, लोहारा येथील गोरक्षण जागा बाबतची चर्चा, जिल्ह्यातील जिल्हा सैनिक शाळा, बाबूपेठ, राजुरा येथील उड्डाणपूल, मूल, पोंभूर्णा, बल्लारशहा या ठिकाणची क्रीडा संकुल, वन अकादमी इमारतीचे बांधकाम, पोलीस प्रशिक्षण केंद्र, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र व महानगरपालिकांच्या वैशिष्टयपूर्ण योजनांचा आढावा घेण्यात आला.याशिवाय महाकाली मंदिर परिसराचा विकास, महानगरपालिका मार्फत तयार होत असलेल्या बाबुराव शेडमाके स्टेडियम व ज्युबिली हायस्कूलसाठी देण्यात आलेल्या विशेष निधीचा आढावादेखील घेण्यात आला.या सर्व योजनांची अंमलबजावणी निश्चित कालमर्यादेत करण्याबाबतचे निर्देश ना. सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिले. त्याबाबतचा अहवाल सातत्याने कळवा, असेही सांगितले.असे आहेत योजनेचे उद्देशसमृद्ध किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध करणे, उत्पन्न वाढ होण्यास मदत करून त्यांना स्वयंपूर्ण बनविणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय शेतकºयांचे समूहगट निर्मिती करणे, बाजाराला जोडलेल्या प्रोडक्शन क्लस्टरची निर्मिती करणे, सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे, शेतीत यांत्रिकीकरण आणि पिकांचे मूल्य वाढविणे, उत्पादित मालासाठी बाजारपेठेची उपलब्धता व उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ मिळून देणे, पूरक व्यवसायांची व्हॅल्यू चेन तयार करणे आदी उद्देश या योजनेचे ठेवण्यात आले आहेत.