शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतर ‘ती’ गवसली, परंतु त्याला स्वीकारण्यास नकार

By admin | Updated: July 8, 2015 01:19 IST

१० वर्षभरापासून एकत्रित राहताना ‘ती’ अचानक बेपत्ता झाली. याबाबत प्रियकराने पोलिसात तक्रार दिली. पोलीस ठाण्यात चकरा मारून प्रेयसीचा शोध लागला काय,

वरोरा : १० वर्षभरापासून एकत्रित राहताना ‘ती’ अचानक बेपत्ता झाली. याबाबत प्रियकराने पोलिसात तक्रार दिली. पोलीस ठाण्यात चकरा मारून प्रेयसीचा शोध लागला काय, म्हणून तो सतत विचारणा करीत होता. अखेर वर्षभरानंतर पोलिसांना बेपत्ता प्रेयसीचा शोध लागला. ही बातमी प्रियकराला कळताच त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला. प्रेयसीला घेण्यासाठी प्रियकर पोहोचला. परंतु, तिने सोबत राहण्यास नकार दिल्याने क्षणार्धात प्रियकराला हिरमुसला होऊन परतावे लागले.वरोरा तालुक्यातील एका गावातील एक अविवाहित वयस्क बल्लारपूर येथे काही कामानिमित्त गेला असता, तेथे त्याची वयस्क महिलेशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि मागील दहा वर्षांपासून दोघेही एकत्र राहू लागले. यामध्ये दोघांनीही कुठल्याही पद्धतीने विवाह केला नाही, हे विशेष!दहा वर्षांपासून दोघेही एकत्र राहत असताना त्याने परत एका विवाहित महिलेला लग्न न करताच आपल्या सोबत ठेवले. मात्र ती महिला काही दिवसांनी निघून गेली. त्यानंतर काही दिवसांनी बल्लारपूर येथील महिलाही त्याला सोडून निघून गेली. याबाबत सदर इसमाने आपली पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली. पत्नीचा फोटोही दिला व तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांसोबतही फिरला. तिचा शोध लागावा व तिला आपल्यासोबत ठेवावे याकरीता ‘तो’ सातत्याने पोलिसांकडे येत होता. पोलिसांनी बेपत्ता झालेल्यांची शोध मोहीम सुरू केली. यात बेपत्ता ‘त्या’ महिलेचा शोध घेताना ती महिला जेथे वास्तव्यास आहे, त्या ठिकाणी पोलीस पोहोचले. पोलिसांना तेथे बघून ती महिला अवाक झाली. मात्र ‘त्या’ महिलेने सोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला. ‘माझी तक्रार देणारा तो कोण, कारण मी त्याच्या सोबत विवाह केलेला नाही. मला तुम्ही शोधले, परंतु मी त्याच्याकडे राहायला जाणार नाही’ असे ती म्हणाली. अखेर बेपत्ता झालेल्या पत्नीच्या प्रकरणावर त्या महिलेने तत्काळ पडदा टाकत बेपत्ता प्रकरणाचा निपटारा केला आणि विवाहाविना असलेला पती पत्नीविना परत आला. (तालुका प्रतिनिधी)