शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

२५ लाखांचा कर भरल्यानंतर सील हटविले

By admin | Updated: August 14, 2016 00:35 IST

येथील मुख्य मार्गावर असलेल्या जयंत चित्रपटगृहाकडे मागील वर्षापासून २५ लाख रुपयांचा करमणूक कर थकीत होता.

चित्रपटगृहावरील कारवाई : एका वर्षांपासून होता करमणूक कर थकीतचंद्रपूर : येथील मुख्य मार्गावर असलेल्या जयंत चित्रपटगृहाकडे मागील वर्षापासून २५ लाख रुपयांचा करमणूक कर थकीत होता. वारंवार सूचना देऊनही कर न भरल्याने करमणूक कर विभागाने जयंत टॉकीजवर शुक्रवारी कारवाई करीत बॉक्स आॅफीसला सील ठोकले. त्यामुळे या चित्रपटगृहातील रात्रीचा शो होऊ शकला नाही. आज शनिवारी सकाळी २५ लाख रुपयांचा कर भरल्यानंतर चित्रपटगृह चालविण्याची परवानगी देण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून शुक्रवारी रात्री परवाना रद्द करीत असल्याचे आदेशपत्र टॉकीजच्या भिंतीवर लावण्यात आले होते.सिनेमागृह व्यवस्थापनाने जिल्हाधिकारी कार्यालयातील कमरणूक कर विभागाकडे नियमित करमणूक कर भरणे आवश्यक असताना टॉकीज व्यवस्थापनाने मार्च २०१५ पासून करमणूक करच भरला नाही. दोन वेळा नोटीस बजावूनही जयंत टॉकीज व्यवस्थापनाने करमणूक कर न भरल्याने जानेवारी २०१६ मध्ये कर विभागाचे अधिकारी कारवाई करण्यासाठी जयंत टॉकीजमध्ये गेले होते. त्यानंतर चित्रपटगृहाचे संचालक जयंत मामीडवार याविरोधात न्यायालयात गेले. न्यायालयाला त्यांनी मार्च २०१६ पर्यंत पैसे भरण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या कालावधीत त्यांनी केवळ सहा लाख रुपयेच कर भरला. उर्वरित कर थकीतच होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री करमणूक कर विभागातील अधिकारी जयंत टॉकीजमध्ये पोहोचले व बॉक्स आॅफीसला सील ठोकले. सर्व तिकिटाही ताब्यात घेतल्या. त्यामुळे रात्री ९.३० वाजताचा शो रद्द करावा लागला. ही कारवाई करताना तहसीलदार आशिष वानखेडे, आयएएस अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते. या संदर्भात सहायक करमणूक अधिकारी विलास वानखेडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या कारवाईची पुष्टी केली. रात्री ९.१५ वाजता ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, शनिवारी टॉकीजच्या मालकांनी २५ लाख रुपये कर भरल्यानंतर सील हटविण्यात आले. त्यामुळे शनिवारी दुपारी १२ वाजताचा शो सुरू झाला. (शहर प्रतिनिधी)