शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ती आरोग्यसेविका निलंबित

By admin | Updated: December 11, 2015 01:26 IST

सुब्बई येथील अंगणवाडीतील बालकांना मुदतबाह्य औषध पाजण्यात आली. यामुळे बालके आजारी पडली.

मुदतबाह्य औषधी प्रकरण : वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई सुब्बई : सुब्बई येथील अंगणवाडीतील बालकांना मुदतबाह्य औषध पाजण्यात आली. यामुळे बालके आजारी पडली. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी या प्रकरणात जबाबदार असलेल्या आरोग्यसेविकेला तात्काळ निलंबित केले.विशेष म्हणजे, बालकांची तपासणी करण्यासाठी येण्यास नकार देणाऱ्या चिंचोली येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राजुरा तालुक्यातील सुब्बई या गावात एकात्मिक बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत अंगणवाडी चालविली जाते. अनेक चिमुकले या ठिकाणी शिकत आहे. दरम्यान, अंगणवाडीमधील बालकांना जंताची औषधी पाजण्यात आली. मात्र ही औषधी मुदतबाह्य होती. त्यामुळे त्या औषधीचा अनेक बालकांवर परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी बालकांना ताप, हगवण व उलट्या सुरू झाल्या. यामुळे पालक चांगलेच घाबरले. बालकांची प्रकृती आणखी बिघडत असल्याने सुब्बई येथून पाच किमी अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली (बु.) येथील डॉक्टरांना भ्रमणध्वनी करून बालकांवर उपचार करण्यास सुब्बई येथे येण्याची विनंती करण्यात आली. मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची विनंती धुडकावून देत सुब्बई येथे येण्यास चक्क नकार दिला. अखेर पालकांनी स्वत:च आपल्या पाल्यांना राजुरा येथील खासगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. याची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी आज गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या गंभीर प्रकरणाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यानंतर मुलांना मुदतबाह्य औषधी पाजणाऱ्या आरोग्यसेविका पाटील यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. यासोबत चिंचोली येथील वैद्यकीय अधिकारी हेमंत फुलझेले यांच्यावरही कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (वार्ताहर)