शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

३० तासांनंतर गवसले शाळकरी मुलाचे प्रेत

By admin | Updated: September 8, 2015 00:44 IST

गंमत म्हणून नदी पात्रात उतरणाऱ्या दहावीतील एका शाळकरी मुलाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्य झाल्याची घटना घडली होती.

वरोरा : गंमत म्हणून नदी पात्रात उतरणाऱ्या दहावीतील एका शाळकरी मुलाचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्य झाल्याची घटना घडली होती. प्रशासनाने युध्दपातळीवर नदीच्या पाण्यात शोध मोहीम सुरू ठेवली. अखेर तीस तासानंतर त्या मुलाचे प्रेत हाती आले.वरोरा शहरा लगतच्या सेंट अ‍ॅन्ट पब्लिक स्कुलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणारे सहा मुले व पाच मुली रविवार असल्याने सकाळीच वरोरा शहरानजीकच्या मार्डा गावातील वर्धा नदीच्या पात्रात गेले होते. ११ मुल-मुलींमध्ये काहींनी शिकवणी वर्गाला दांडी मारली होती. नदीच्या पात्रात उतरलेला श्रेयस प्रकाश खारोडे याने पाण्यात पोहण्याकरिता उडी घेतली. तो काही कळण्याच्या आतच खोल पाण्यात जाऊन गटांगळ्या खाऊ लागल्याने त्याच्यासोबत असलेल्या दोन मुलांनी श्रेयसला वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले व श्रेयस बुडाला. ही माहिती वरोरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून स्थानिकांच्या मदतीने शोध मोहीम राबविली. परंतु त्यात यश आले नाही. त्यामुळे चंद्रपूर पोलीस मुख्यालयातील बोट व तज्ज्ञांच्या चमूसह घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्यासोबत माजरी येथील विक्रम जव्हेरीया व वरोरा येथील विठ्ठल कार्लेकर यांनी रविवारपासून शोध मोहीम राबविली. त्या दिवशी मृतदेहाचा थांगपत्ता लागला नाही व अंधार पडल्याने शोध मोहीम थांबविली. सोमवारी सकाळी ६ वाजेपासून शोध मोहीम राबविणे सुरू केले. दुपारच्या सुमारास श्रेयसचा मृतदेह हाती लागला. मृतदेहाची उत्तरणीय तपासणी व शवविच्छेदन करून मृतदेह आप्तेष्टांच्या ताब्यात दिल्यानंतर वरोरा येथील बोर्डा पुलानजीकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रेयस विनायक नगरात राहत होता. त्याचे मातापिता वैद्यकीय अधिकारी आहेत. (तालुका प्रतिनिधी)