शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अधिवक्त्यांना वैद्यकीय विमा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST

चंद्रपूर : अधिवक्त्यांना पारिवारिक वैद्यकीय विमा योजना लागू करण्याची मागणी अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद ...

चंद्रपूर : अधिवक्त्यांना पारिवारिक वैद्यकीय विमा योजना लागू करण्याची मागणी अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

अखिल भारतीय अधिवक्ता परिषद लखनऊमध्ये झालेल्या राष्ट्रीय संमेलनात केंद्र सरकारने सर्व अधिवक्तांना पारिवारिक वैद्यकीय विमा योजना लागू करण्याचा ठराव केला होता. त्या अनुषंगाने ही मागणी करण्यात आली. अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. अभय कुल्लरवार म्हणाले, कोरोनामुळे अनेक अधिवक्तांच्या व्यावसायिक उत्पन्नावर प्रभाव पडला असून आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे सरकारने वकिलांच्या परिवाराच्या सुरक्षेकरिता पारिवारिक वैद्यकीय विमा योजना लागू करावी. तर अधिवक्ता परिषदेचे सचिव व सहायक सरकारी अधिवक्ता ॲड. संदीप नागपुरे अधिवक्त्यांच्या कुटुंबांना केंद्र सरकारतर्फे लाभ मिळत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पारिवारिक वैद्यकीय विमा योजनेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. निवेदन देताना परिषदेचे कोषाध्यक्ष ॲड. अमन मारेकर, ॲड. अभय पाचपोर, ॲड. सतीश भोयर, ॲड. गिरीश मार्लीवार, ॲड. विनय लिंगे, ॲड. प्रवीण पिसे, ॲड. जयप्रकाश पांडे, ॲड. गोपाल पाटील, ॲड. राशिद शेख, ॲड. विनोद मोडघरे, ॲड. व्यंकटेश श्रिरामुला, ॲड. भूषण वांढरे, ॲड. अमर बनकर आदी उपस्थित होते.