शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी आदिवासी कोलामांचे हेलपाटे

By admin | Updated: September 5, 2015 01:11 IST

तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कृष्णा वैनगंगा ग्रामीण बँक शाखा अधिकारी जिवती यांच्या मनमानी कारभारामुळे खडकी,....

शाखा अधिकाऱ्यांची मनमानी : खातेदारांना अपमानास्पद वागणूकजिवती: तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कृष्णा वैनगंगा ग्रामीण बँक शाखा अधिकारी जिवती यांच्या मनमानी कारभारामुळे खडकी, रायपूर येथील आदिवासी कोलामांना पीक कर्जासाठी अनेक दिवसापासून बँकेचे हेलपाटे मारावे लागत आहे. याबाबत विचारणा करणाऱ्या आदिवासी कोलामांना अपमानास्पद वागणूक देतात. कर्ज द्यायचे, नाही द्यायचे हे आमच्यावर आहे. तुम्ही कुठेही जा, आमचे काहीच बिघडवू शकत नाही, असे ते बोलत असून कोलामांना वेटीस धरणाऱ्या दोषी शाखा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.शेतीच्या कामासाठी पीक कर्जाची मागणी करणाऱ्या नागरीकांना तत्काळ पीक कर्ज देण्यात यावे, असे शासनाचे आदेश असतानाही येथील शाखा अधिकाऱ्यांनी आपली मनमानी चालवीत आदिवासी कोलामांना वेटीस धरत आहे. सध्या शेतातील पिकांना फळधारणा व पिकाची वाढ व्हावी, यासाठी रासायनिक खत, फवारणीसाठी कीटकनाशक औषधी खरेदी करण्यासाठी त्यांना पैसाची गरज निर्माण झाली. त्यामुळे त्या नागरिकांनी पीक कर्जाची मागणी केली. मात्र चकरा मारुनही मिळत नसल्याने पहाडावरील शेतकरी व आदिवासी कोलाम हतबल झाले आहेत. याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने शाखा अधिकारी यांना विचारले असता, आमचे काम सुरळीत चालू आहे. कोणाला कधी कर्ज द्यायचा तो आम्ही ठरवू या. संदर्भात वारंवार चर्चा करण्यासाठी येऊ नका, असे उद्धटपणे उत्तर दिले. पीक कर्ज देण्यासाठी विलंब करणाऱ्या अशा शाखा अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मारोती सिगम यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)