शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी प्रशासन अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST

कोरोनाचा फैलाव होण्याची जास्त शक्यता असणारे सुपरस्प्रेडर वृत्तपत्र विक्रेते, भाजी विक्रेते, दूधवाले, किराणा दुकानदार, केश कर्तनालय, बॅण्डवाले, कॅटरिंग ...

कोरोनाचा फैलाव होण्याची जास्त शक्यता असणारे सुपरस्प्रेडर वृत्तपत्र विक्रेते, भाजी विक्रेते, दूधवाले, किराणा दुकानदार, केश कर्तनालय, बॅण्डवाले, कॅटरिंग कामगार, रोजंदारी मजूर अशा विविध गटात विभागून तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन बेड, औषधसाठा व मनुष्यबळ योग्य प्रमाणात उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले. प्रतिकारशक्ती जाणून घेण्यासाठी पाच हजार नागरिकांचे सिरो सर्वेक्षण केले जाणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्र सुरपाम, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. साठे आदी प्रामुख्याने उपस्थित होते, तर व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, महापौर राखी कांचनवार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

१६ रुग्णांची नव्याने भर; एकाचा मृत्यू

जिल्ह्यात २४ तासात १२ जणांनी कोरोनावर मात केली, तर १६ बाधितांची नव्याने भर पडली. एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार २९४वर पोहोचली आहे. बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ७९१ झाली आहे. सध्या १०८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख आठ हजार २७५ नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी एक लाख ८३ हजार १७२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यामध्ये भद्रावती येथील युवकाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३९५ बाधितांचे मृत्यू झाले.