शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विविध ‘अ‍ॅप्स’ विकसित करून प्रशासन अपडेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:23 IST

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यावेळी प्रशासकीय यंत्रणा पहिल्यांदाच विविध हायटेकअ‍ॅप्स विकसित करून ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार आहे. निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले विविध अ‍ॅप्स या काळात वापरण्यासाठी कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. याकरिता तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांना बोलावण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यावेळी प्रशासकीय यंत्रणा पहिल्यांदाच विविध हायटेकअ‍ॅप्स विकसित करून ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार आहे. निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेले विविध अ‍ॅप्स या काळात वापरण्यासाठी कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. याकरिता तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांना बोलावण्यात आले होते.निवडणुकीच्या अनुषंगाने आयसीटी अ‍ॅप्लिकेशन्स तयार करण्यात आले आहेत. व्होटर हेल्पलाईन, पीडब्ल्यूडी अ‍ॅप, सुविधा, सी-व्हिजिल, समाधान असे सहा अ‍ॅप्स निवडणुकीच्या काळात वापरण्यात येणार आहेत. व्होटर हेल्पलाईन या अ‍ॅपमध्ये मतदाराचे नाव, ओळखपत्र आदी माहिती सहजरित्या उपलब्ध होणे शक्य होईल. पीडब्ल्यूडी अ‍ॅप दिव्यांग मतदारांसाठी विकसित करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना या अ‍ॅपद्वारे सहजपणे सुविधा मिळविता येणे शक्य होईल. विविध राजकीय पक्षांसाठीही सुविधा अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. या अ‍ॅपद्वारे निवडणुकीच्या अनुषंगाने लागणाऱ्या सर्व परवानग्या राजकीय पक्षांना मिळविणे सोपे होणार आहे. आवश्यक पुरावे सादर केल्यास काही तासातच परवानगी देण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आले.प्रचाराच्या कालखंडात आचारसंहितेचा भंग होत असल्यास सामान्य नागरिकांसाठी सिव्हिजिल अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवरून आचारसंहिता भंग झाल्याबाबतची तक्रार नागरिकांना करता येईल. शनिवारपर्यंत या अ‍ॅपवरून १० तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या. हे अ‍ॅप थेट निवडणूक आयोगाशी जोडण्यात आले. त्यामुळे तक्रार प्राप्त होताच कारवाई करण्यासाठी संबंधित यंत्रणा पुढे येते. सुविधा आणि समाधान या दोन्ही अ‍ॅपद्वारे तक्रार निवारणासाठी वापर केला जाणार आहे. १९५० हा टोल फ्री क्रमांक मतदारांच्या गाऱ्हाणी जाणून त्या सोडवणुकीसाठी तयार करण्यात आले आहे.एक खिडकी कक्षजिल्हाधिकारी कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर एक खिडकी आणि माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला आहे. निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष देखील त्याच मजल्यावर स्थापन करण्यात आला आहे. सोशल मीडिया, मुद्रित व दृकश्राव्य माध्यमांवरील जाहिरातीवर खर्च नियंत्रण कक्ष लक्ष ठेवून राहणार आहे. एक खिडकीतून विविध परवानग्या मिळणे सोपे होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. २८ मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अधिसूचना जारी होणार असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे.