शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

निधीअभावी अडला निम्न पैनगंगा प्रकल्प

By admin | Updated: December 29, 2014 01:09 IST

शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळावे, या उद्देशाने राज्य शासनाने निम्न पैनगंगा प्रकल्प प्रस्तावास मंजुरी दिली.

नांदाफाटा : शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळावे, या उद्देशाने राज्य शासनाने निम्न पैनगंगा प्रकल्प प्रस्तावास मंजुरी दिली. त्यानंतर प्रकल्पाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. मात्र वर्ष लोटूनही निधीअभावी या प्रकल्पाचे काम पुढे गेले नाही. यामुळे यवतमाळ, चंद्रपूर तथा तेलंगणा राज्यातील हजारो हेक्टर शेती सिंचनाला मुकली आहे. या प्रकल्पासाठी साधारणत: १४ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. परंतु, प्रकल्प पूर्णत्वास न आल्याने आता त्याच कामासाठी शासनाला १५ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या प्रकल्पामुळे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी, झरीजामणी, वणी, पांढरकवडा, चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, राजुरा, बल्लारशाह तर तेलंगणातील बेला, जैनत आदी तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. आजमितीला कोरपना तालुक्यात एकूण ४५ हजार हेक्टर जमिनीवर शेती केली जाते. यापैकी केवळ चार हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. यातही बोअरवेल, विहीर हेच सिंचनाचे प्रमुख स्त्रोत असून नदीवरुन होणारे सिंचनही कमी प्रमाणात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे या प्रकल्पाच्या पूर्णत्वाकडे लक्ष लागून आहे. मात्र, शासनाने या प्रकल्पासाठी निधीच मंजूर न केल्याचे शेतकऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे. शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने निधी मंजूर करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)