शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
5
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
6
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
7
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
8
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
9
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
10
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
11
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
12
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
13
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
14
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
16
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
17
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
18
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
19
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!

रामाळा तलाव सरोवर संवर्धन योजनेत समाविष्ट करा

By admin | Updated: January 8, 2016 01:54 IST

चंद्रपूर शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरावर गोंड राजाचे राज्य होते.

महेश मेंढे यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन चंद्रपूर : चंद्रपूर शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरावर गोंड राजाचे राज्य होते. गोंडराजांनीच या शहराच्या संरक्षणासाठी परकोट बांधला व त्याकाळी बांधण्यात आलेला रामाळा तलाव आजही ऐतिहासिक वैभवाची साक्ष देत आहे. मात्र चंद्रपूर शहराचे सौंदर्य खुलविणाऱ्या या तलावाची वाटचाल जर्जरतेकडे सुरू आहे. ऐतिहासिक वास्तू टिकविण्यासाठी पुरातत्व खाते काम करीत आहे. मात्र रामाळा तलावासारखे ऐतिहासिक तलावाचे संवर्धन करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसल्याने या तलावाचे संवर्धन व्हावे, चंद्रपूरकरांना हा तलाव ऐतिहासिक वैभवाची साक्ष म्हणून कायम स्मरणात रहावा, यासाठी रामाळा तलावाला राज्य सरोवर संवर्धन योजनेत समावेश करुन तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात यावा, या मागणीचे निवेदन चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे प्रमुख महेश मेंढे यांनी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांना दिले आहे.महेश मेंढे यांनी निवेदना म्हटले आहे, चंद्रपूर शहरातील मनपाच्या हद्दीत असलेला रामाळा तलाव व संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या तलावालगतच रामाळा उद्यानही आहे. शहरात आधीच बगिचे कमी आहेत. अशा परिस्थितीत शहराचे सौंदर्य खुलविणारा व शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा रामाळा तलाव जपणे आवश्यक असल्यामुळे या तलावाला राज्य सरोवर संवर्धन योजनेत समाविष्ठ केल्यास तलावाच्या संवर्धनाकरीता २५ कोटीचा निधी उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शासनास जिल्हा प्रशासनाकडून तसा प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणी महेश मेंढे यांनी केली. यावेळी दिनेश चोखारे, शिवा राव, सचिन कत्याल, नरेश मोटवाणी, सौरभ बुरेवार, सचिन रणवीर, महेश, निलेश मून आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)