शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

खडसंगीला ‘बफरझोन’ क्षेत्रात समाविष्ट करा

By admin | Updated: July 31, 2015 01:30 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांचा समावेश व्याघ्र सीमा बफर झोनमध्ये आहे.

वनमंत्र्याना निवेदन : भीमशक्ती युवक संघटनेची मागणी खडसंगी : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांचा समावेश व्याघ्र सीमा बफर झोनमध्ये आहे. मात्र या गावांमधील विद्यार्थ्यांना अनेक बफर झोनच्या (वन विभागाच्या) सवलतीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे खडसंगी गावाचा समावेश बफर झोन गावाच्या यादीत समावेश करण्याची मागणी खडसंगी येथील भीमशक्ती युवक संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे.देशात वाघासाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये हमखास वाघाचे दर्शन होते. त्यामुळे लाखो पर्यटक या प्रकल्पाला भेटी देतात. त्यामुळे वनविभागाला या पर्यटकाकडून लाखो रुपयाचा महसूल मिळतो. मात्र या प्रकल्पापासून बाधीत झालेले अनेक गावाचा समावेश बफर झोन गावाच्या यादीत समावेश करण्यात आला. त्यामुळे या गावातील नागरिकांना व्याघ्र प्रकल्पाच्या सुविधा मिळत आहेत.मात्र खडसंगीमध्येच बफर झोन वनविभागाचे कार्यालयसुद्धा आहे. तर व्याघ्र प्रकल्पाची सीमा खडसंगी गावाच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर आहे. तरी मात्र खडसंगी गावाचा समावेश बफर झोन क्षेत्राच्या गावाच्या यादीत नाही. त्यामुळे खडसंगी गाव वन्य प्राण्याच्या हैदोसाने व्यथित आहे. तर अनेकांना नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.या बाबीची दखल घेवून ग्रामपंचायत कार्यालयाने मागील ग्रामसभेत खडसंगीचा बफर झोनमध्ये समावेश करण्याचा ठराव घेतला आहे. त्यामुळे शासनाने या गावाचा समावेश बफर झोन क्षेत्रात करावा, या मागणीचे निवेदन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भीमशक्ती युवक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप रामटेके, आशीष गजभिये, अमन फुलझेले, विपीन गजभिये, आशीष राऊत, सचिन सोनटक्के, संजय रामटेके, गौतम रामटेके, कुणाल रामटेके, प्रफुल्ल मेश्राम, प्रफुल्ल रामटेके, आनंद जांभुळे आदी कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)