शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्णकर्कश वाहनांवर कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:23 IST

वाहन पार्किंगसाठी फुटपाथचा वापर चंद्रपूर : येथील महात्मा गांधी, कस्तुरभा रोड ते पठाणपुरा गेटपर्यंत फुटपाथवर वाहन पार्किंग केल्या जात ...

वाहन पार्किंगसाठी फुटपाथचा वापर

चंद्रपूर : येथील महात्मा गांधी, कस्तुरभा रोड ते पठाणपुरा गेटपर्यंत फुटपाथवर वाहन पार्किंग केल्या जात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, महानगरपालिकेची लोकमान्य टिळक शाळेजवळ अनेकजण चारचाकी वाहने उभे ठेवतात. त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.

स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

चंद्रपूर : नागरिकांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायतीच्या बहुतांश कार्यालयात अस्वच्छता आहे. त्यामुळे या कार्यालयांनी प्रथम स्वत:ची कार्यालये स्वच्छ करावी, अशी मागणी सामान्य नागरिकांनी केली आहे.

रिक्त पदे भरण्याची मागणी

चंद्रपूर : ग्रामीण भागातील आरोग्य सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. रिक्त पदे भरून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : शहरातील काही प्रभागात मागील काही दिवसांपासून सतत लंपडाव सुरू असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसभर विजेचा कमी अधिक दाब होत असल्याने अनेक उपकरणे बंद चालू होत असतात. तर काही वेळा एका फेजची वीज राहत नाही. याबाबत येथील नागरिकांनी वीज कंपनीकडे तक्रार केली आहे. मात्र वीज कंपनीचे अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने ग्राहकांत रोष पसरला आहे.

बोगस डॉक्टरांवर कारवाई करा

चंद्रपूर : जिल्ह्यातील काही दुर्गम गावात बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटली आहे. बोगस डॉक्टर असून रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यापूर्वी जिल्हा परिषदेने यासंदर्भात मोहीम सुद्धा राबविली होती.

सुविधांकडे लक्ष द्यावे

चंद्रपूर : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना चांगले आरोग्य मिळावे, यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण केले आहे. या माध्यमातून नागरिकांना शासनाच्या आरोग्यदायी योजनांचा लाभ मिळण्याचा उद्देश आहे. मात्र अनेक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित नसतात.