शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

दारुपार्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईस दिरंगाई

By admin | Updated: April 16, 2016 00:45 IST

तालुक्यातील चंदनखेडा येथील विदर्भ कोकण बँकेच्या शाखेत बँक शाखा अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी नेहमीच दारूपार्टी करीत असल्याची तक्रार ...

बँकेतील प्रकार : तक्रारीला वरिष्ठांकडून केराची टोपलीभद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथील विदर्भ कोकण बँकेच्या शाखेत बँक शाखा अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी नेहमीच दारूपार्टी करीत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी आठ महिन्यापूर्वी बँकेच्या अध्यक्षांकडे केली होती. मात्र त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात न आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.चंदनखेडा हे गाव केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आदर्श गाव करण्याचे हेतूने दत्तक घेतले आहे. अशा गावात या प्रकारचे अधिकारी व कर्मचारी राहिल्यास खरच ते गाव आदर्श होईल का? असा प्रश्न गावकरी करीत आहेत. चंदनखेडा बँकेचे शाखा व्यवस्थापक म्हणून सुधाकर बरडे हे रूजू झाल्यापासून ते आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना सोबत घेवून बँक बंद झाल्यानंतर बंद दार बँकेत नेहमीच दारू पार्टी करतात. यात ते आपले कर्मचारी रोखपाल भैय्या वाघ, चपराशी रितेश दोहतरे यासह इतर जवळच्या मित्रांना सोबत घेतात. या शाखा अधिकाऱ्याचा त्यांचे कर्मचारी व मित्रांसोबत दारू पित असलेली मोबाईलद्वारे व्हिडीओ शुटींग प्रथम चंद्रपूरचे विभागीय व्यवस्थापक यांचेकडे तक्रारीसह घेवून गेले असता, त्यांनी ते घेण्यास नकार दिला. विभागीेय व्यवस्थापकांनी त्यांच्या या कृत्याला नकार देवून एक प्रकारचे त्यांच्या कृत्याचे समर्थन केले. नंतर ही तक्रार विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे नागपूर येथील अध्यक्ष यांच्याकडे पाठविण्यात आली. परंतु आठ महिन्यात कालावधी लोटून सुद्धा तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा हा दारूबंदी जिल्हा असल्याने एखाद्या शासकीय कार्यालयात असा प्रकार चालत असताना त्याची दखल घेणे गरजेचे होते. परंतु या कृत्याला बँकेचे वरिष्ठ अधिकारीच समर्थन देत असेल तर त्या बँकेचा व्यवहार कसा असेल, हे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)