शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

दीपालीच्या आरोपींवर कारवाई, मग आशाच्या पदरी निराशा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:28 IST

चंद्रपूर : आशा तुळशीराम घटे या १९ वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली. तुळशीराम घटे यांची शेती पोवणी-३ ...

चंद्रपूर : आशा तुळशीराम घटे या १९ वर्षीय तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली. तुळशीराम घटे यांची शेती पोवणी-३ या को‌ळसा खाणीत गेली. प्रकल्पग्रस्त असल्यामुळे आशाला नोकरी मिळावी, अशी त्यांची इच्छा. आशाने नोकरीसाठी प्रयत्न केले. वेकोली अधिकाऱ्यांकडे नोकरीसाठी कागदपत्रांसह चकरा मारायची. अशातच एक दिवस ती विष प्राशन करून आपली इहलोकाची यात्रा संपविते. असे काय घडले, ज्यामुळे आशाला ही टोकाची भूमिका घ्यावी लागली? अमरावतीच्या आरएफओ दीपाली चव्हाणच्या आरोपींना अटक झाली. मग आशाच्या पदरी निराशा का? या प्रश्नाचे उत्तर पोलीस प्रशासन शोधून देईल काय, असाही सवाल उपस्थित होत आहे.

राजुरा तालुक्यातील साखरी येथील तुळशीराम घटे हल्ली मुक्काम सास्ती ता. राजुरा यांची शेतजमीन वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोवनी-३ कोळसा खाणीकरिता अधिग्रहीत करण्यात आली. पत्नी, दोन मुली व एक मुलगा असे तुळशिराम घटे यांचे कुटुंब. वेकोलीत शेतजमीन गेल्यामुळे भूमिहीन झालेले तुळशीराम घटे हे सास्ती येथे वास्तव्यास आले. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना शेती अधिग्रहणाचा मोबदला मिळाला. त्यांचे वय जास्त असल्यामुळे आपल्या मुलीला आशाला नोकरी द्यावी, असे पत्र त्यांनी वेकोली व्यवस्थापनाला दिले. १९ वर्षीय आशा मोठ्या आशेने आता नोकरीसाठी प्रयत्न करू लागली. दरम्यान, लालफीतशाहीत तिला वाईट अनुभव आला. २२ मार्च रोजी ती वेकोलीचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलीया यांच्याकडे गेली होती. यानंतरच तिची प्रकृती बिघडली. २३ मार्च रोजी तिच्या स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले. २७ मार्चला प्रकृती अधिक खालावल्याने तिला चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान ३१ मार्च रोजी आशाची प्राणज्योत मालवली. आशाने विष घेतले असावे. त्याचे प्रमाण कमी असल्यामुळे हे विष हळूहळू आपला प्रभाव दाखवत होते, अखेर यात तिचा बळी गेला. आशाचा मृत्यू विषामुळे झाला असला तरी ते तिने का घेतले, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या घटनेनंतर नेहमीप्रमाणेच पोलीसही तक्रार घेण्यास टाळाटाळ करू लागले. याचाच अर्थ पोलीस आशाला न्याय देणार नाही, हे लक्षात आल्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आशाचा मृतदेह घेऊन वेकोली कार्यालय गाठले; मात्र अद्यापही आशाला न्याय मिळाला नाही.

वेकोलीच्या अधिकाऱ्यांमुळे आशाचा बळी गेल्याचा आरोप आशाच्या वडिलाचा आहे; मात्र पोलीस यंत्रणा हे प्रकरण दडपण्याच्या मानसिकतेत सुरुवातीपासूनच असल्यामुळे त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा कोण करणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

२२ मार्चला काय घडले?

२२ मार्च रोजी आशा घटे ही वेकोलीचे क्षेत्रीय योजना अधिकारी जी. पुलीया यांच्याकडे गेली होती. यानंतरच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान, तिच्यासोबत काय घडले, यामुळे आशाने टोकाचे पाऊल उचलले, याचा शोध पोलीस का घेत नाही. पोलिसांचे हात वेकोलीने बांधले काय? हे प्रश्न खाकीवर संशय निर्माण करायला लावणारे आहे.