शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

तोंडखुरीची लागण; २५ मेंढ्यांचा मृत्यू

By admin | Updated: August 29, 2016 01:19 IST

गोंडपिपरी तालुुक्यातील तोहोगाव येथे मेंढ्यांना तोंडखुरी रोगाची लागण सुरू असून योग्य उपचाराअभावी दररोज दोन-तीन मेंढ्या मरत आहेत.

तोहोगाव परिसरातील घटना : उपाचाराअभावी दररोज मरतात मेंढ्यातोहोगाव : गोंडपिपरी तालुुक्यातील तोहोगाव येथे मेंढ्यांना तोंडखुरी रोगाची लागण सुरू असून योग्य उपचाराअभावी दररोज दोन-तीन मेंढ्या मरत आहेत. डॉक्टर मात्र आठवड्यातून एकदाच पशु वैद्यकीय रुग्णालयात येत असतात. डॉक्टरच्या गैरहजेरीमुुळे परिचराकडून उपचार सुरू असून आतापर्यंत या परिसरातील मेंढपाळाच्या २५ मेंढ्या मरण पावल्या. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.तोहोगाव या परिसरात सर्वात जास्त पशुधन असल्यामुळे येथे पशु वैद्यकीय रुग्णालय श्रेणी-१ चे रुग्णालय २५ वर्षापासून आहे. या अगोदरचे सर्वच वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी निवासी असायचे व पशुधनावर योग्य उपचार करायचे. या रुग्णालयात तीन चतुर्थ कर्मचारी व एक वैद्यकीय अधिकारी अशी पदभरती असताना सुद्धा येथे सध्या एक वैद्यकीय अधिकारी व एक परिचर असे दोनच कर्मचारी कार्यरत आहेत. येथे कार्यरत डॉक्टर तर आठवड्यातून एकदाच रुग्णालयात येतात. बाकी दिवस फोनवरच परिचराला उपचारासंबंधी सुचना देतात. परिचर फक्त रुग्णालयात आणलेल्या जनावरांवर थातुर-मातुर उपचार करते. तर गंभीर आजारी जनावरांवर उपचार करण्यासाठी घरी बोलावले तर पैसे घेतल्याशिवाय घरी येवून उपचार करीत नाहीत, असे पशुपालकांचे म्हणणे आहे. येथील मेंढपाळांनी आपल्या बकऱ्या-मेंढ्या पशु वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने या परिचरांनी थातुर-मातुर औषधोपचार केला. त्यांच्या मेंढ्याना कसलाही फायदा झाला नाही. त्यामुळे मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तोंडखुरी रोगावर या वैद्यकीय रुग्णालयात औषधच नसल्याचे परिचर सांगत आहे. तोंडखुरीची लागण झालेल्या मेंढ्यांच्या तोंडातून चिकट द्रव पडत असून खाली मान टाकून मेंढी उभी असते. ती काहीच खात नाही. दोन दिवस तशीच राहते व तिसऱ्या दिवशी ती मृत पावते. आजपर्यंत तोहोगाव येथील कविश्वर चिडे यांच्या ९ मेंढ्या, मेघराज चिडे यांचे ७, सुनील चिडे ५, मनोज चिडे यांच्या २ मेंढ्या मरण पावल्या आहेत. शेवटी या मेंढपाळाने तेलंगना राज्यातील कागजनगर येथून औषध विकत आणून खासगी डॉक्टरकडून उपचार सुरू केला आहे. काही प्रमाणात तोंडखुरी रोग आटोक्यात आला. परंतु, तेवढी सुधारणा अजुनही झालेली नाही. या गंभीर रोगाकडे शासनाने लक्ष देवून मेंढपाळांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्यकारिणीने केली आहे. (वार्ताहर)