शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बनावट फेसबुक आयडी तयार करणारा आरोपी गजाआड

By admin | Updated: September 19, 2015 01:22 IST

मेंडकी उपपोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या हळदा (आवळगाव) येथील हरबच्चन सिंग गुरुदीप सिंग टांक या इसमाच्या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करुन ....

अश्लील फोटो केले अपलोड : आरोपीला न्यायालयीन कोठडीमेंंडकी : मेंडकी उपपोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या हळदा (आवळगाव) येथील हरबच्चन सिंग गुरुदीप सिंग टांक या इसमाच्या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करुन त्यावर अश्लील फोटो व मजकूर अपलोड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.सोरेनसिंग संगतसिंग दुधानी (२२) रा. कॉलरी वार्ड वरोरा असे आरोपीचे नाव आहे. हळदा (आवळगाव) येथील हरबच्चनसिंग गुरुदीपसिंग टांक (२९) यांच्या नावाने सोरेनसिंग याने फेसबुकची बनावट आयडी सुरू केली. त्यावर हरबच्चनसिंग गुरुदीपसिंग टांक याचे फ्रोफाईलवर फोटो टाकून त्यांच्या फेसबुक आयडीवर फ्रेन्ड्स रिक्वेस्ट (विनंती) पाठविली असता हरबच्चनसिंग गुरुदीपसिंग टांक यांनी ती फ्रेन्ड्स रिक्वेस्ट स्वीकारली. तेव्हा हरबच्चन सिंग टांक यांना फेसबुक आयडीवर आपली स्वत:चे प्रोफाईल फोटो असल्याचे निदर्शनात आले. परंतु, याकडे हरबच्चनसिंग टांक यांनी दुर्लक्ष केले. याच संधीचा फायदा घेत सोरेनसिंग दुधानी याने फेसबुक आयडीचा गैरफायदा घेत होता. फेसबुक आयडीवर अश्लील फोटो व मजकूर अपलोड करुन सोरेनसिंग दुधानी हा सतत फेसबुकवर आॅनलाईन राहायचा. हा प्रकार जास्त वाढला. त्यामुळे हरबच्चनसिंग टांक यांनी त्याच्याविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मेंढकी पोलिसांनी याची दखल घेत आरोपी सोरेनसिंग संगतसिंग दुधानी याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस करीत असून ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांच्या मार्गदर्शनात केली. (वार्ताहर)