शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

२०० रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

By admin | Updated: September 6, 2015 00:54 IST

अनुदानाचा निधी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेले संमतीपत्र देण्यासाठी २०० रुपयांची लाच स्वीकारताना जामगाव कोमटी येथील तलाठी भारत पगाडे याला ..

खडसंगी : अनुदानाचा निधी प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेले संमतीपत्र देण्यासाठी २०० रुपयांची लाच स्वीकारताना जामगाव कोमटी येथील तलाठी भारत पगाडे याला चंद्रपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी रंगेहात पकडून अटक केली.चिमूर तालुक्यातील भिसी येथील एका शेतकऱ्याची चिखली मोकासा येथे दीड एकर शेती आहे. राज्यशासनातर्फे सदर शेतकऱ्याला चालू शेती हंगामात धान अनुदानापोटी २७०० रुपयांचे अनुदान मंजूर झाले. परंतु सदर अनुदान परस्पर लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होत असल्याने बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी संबंधित बँक व्यवस्थापकाच्या नावे तलाठ्याचे संमतीपत्र आवश्यक होते. त्यानुसार संबंधित शेतकऱ्याने जामगाव (कोमटी) साजाचे तलाठी भारत पगाडे याची भेट घेतली तेव्हा या प्रमाणपत्रासाठी पगाडे याने २०० रुपयांची लाच मागितली. गरजेपोटी शेतकऱ्याने त्याला ही रक्कम दिली. त्यानंतर तलाठ्याने प्रमाणपत्र दिले. सदर संमतीपत्र वैनगंगा क्षेत्रिय बँक शाखा भिसीच्या व्यवस्थापकाच्या नावे होते. मात्र शेतकऱ्याच्या अनुदानाचा धनादेश वैनगंगा क्षेत्रिय बँकेऐवजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भिसी शाखेत दाखल झाला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने पुन्हा तलाठी पगाडे यांची भेट घेऊन जिल्हा बँकेच्या नावाने संमतीपत्र तयार करून देण्याची विनंती केली. परंतु पगाडे यांनी पुन्हा २०० रुपये लाचेची मागणी केली. मात्र अगोदरच पैसे दिले असल्याचे संबंधित शेतकऱ्याने सांगितल्यानंतर पगाडे यांनी संमतीपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे सदर शेतकऱ्याने यासंदर्भात थेट चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार केली. तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने शनिवारी चिमूर येथील तहसील कार्यालयात सापळा रचला. यादरम्यान, तलाठी पगाडे याने लाचेची रक्कम स्वीकारताच त्याला रंगेहात पकडून अटक केली. (वार्ताहर)