शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामातील पेरणीपूर्वी मशागतीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक कृषी साधनांचा उपयोग करून शेतकरी आपला विकास करतात. मात्र, जिल्ह्यात पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीच संख्या सर्वाधिक आहे. अत्याधुनिक साधनांचा उपयोग शेतीसाठी करणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकरी निसर्गाची साथ तसेच शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आशावादी दृष्टीने बघतात. मागील हंगामात विविध कीड रोगांनी पिकांवर आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले होते.

ठळक मुद्देशिवारात लगबग, बियाणे, खते, घेण्यासाठी पैशाची जुळवाजुळव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला आता वेग आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिवारात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे. यंदा कोरोनामुळे शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याने पैशाची जुळवाजुळवा करणे हे सर्वात मोठे आव्हान ठरत आहे.आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन अत्याधुनिक कृषी साधनांचा उपयोग करून शेतकरी आपला विकास करतात. मात्र, जिल्ह्यात पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचीच संख्या सर्वाधिक आहे. अत्याधुनिक साधनांचा उपयोग शेतीसाठी करणे अशक्य आहे. त्यामुळे शेतकरी निसर्गाची साथ तसेच शासनाकडून मिळणाऱ्या मदतीकडे आशावादी दृष्टीने बघतात. मागील हंगामात विविध कीड रोगांनी पिकांवर आक्रमण केल्याने मोठे नुकसान झाले होते.काही तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने उत्पादनात घट झाली. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले होते. यंदाही रबी हंगामातील कापूस व अन्य शेतमालाची विक्री होऊ शकली नाही. या वर्षी राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यात सोयाबीन पेरा वाढणार आहे. शेतीसाठी पैशाची गरज असल्याने शेतकरी पीक कर्जासाठी चकरा मारत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पीक कर्जाची प्रकरणे निकाली काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.पाच तालुक्यात ट्रॅक्टरचा वापर वाढलाराजुरा, ब्रह्मपुरी, वरोरा, भद्रावती व नागभीड तालुक्यात खरीप हंगामाची कामे करण्यासाठी यंदा ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. बैलाचा वापर करून वखरणी, नांगणीपासून पेरणीपर्यंत तर पीक काढण्यापर्यंतची कामे केली जातात. पण, गाय, बैलांना पुरेसे खाद्यान्न मिळत नाही. हंगामासाठी बराच कालावधी जातो. त्यामुळे काही शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करून मशागतीची कामे करीत आहेत.शेणखताचे दर वधारलेकाही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांकडे पाळीव जनावरांची संख्या बरीच होती. त्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी चांगले बैल मिळायचे. गाशी म्हशींमुळे उत्तम दर्जाचा खत उपलब्ध व्हायचा. मात्र, हे चित्र आता बदलत आहे. पाळीव जनावरे नसल्याने शेणखत मिळणे कठीण झाले. त्यामुळे पिकांच्या पोषणासाठी शेतकरी इतरांकडून शेण खताची खरेदी करतात. त्यामुळे यंदा शेण खताचे दर वाढले आहेत.

टॅग्स :agricultureशेती