शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी सरपंचासह तत्कालीन ग्रामसेवकावर कारवाईचे संकेत

By admin | Updated: September 16, 2015 00:59 IST

तालुक्यातील मालडोंगरी येथील मनरेगामध्ये झालेल्या भ्रष्टाचारात दोषी आढळलेले नवनिर्वाचित सरपंच जयपाल दामोधर पारधी यांना अटक करण्यात आली.

रोहयो घोटाळा : ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील प्रकार ब्रह्मपुरी : तालुक्यातील मालडोंगरी येथील मनरेगामध्ये झालेल्या भ्रष्टाचारात दोषी आढळलेले नवनिर्वाचित सरपंच जयपाल दामोधर पारधी यांना अटक करण्यात आली. त्यानी पोलीस कोठडीत दिलेल्या जबानित माजी सरपंच गौतम भिकाजी धोंगडे यांना अटक झाली असून तत्कालिन ग्रामसेवकावरही अटकेची टांगती तलवार असल्याचे संकेत आहेत.मालडोंगरी येथे मागील वर्षी झालेल्या मनरेगा कामात एक लाखापेक्षा जास्त रुपयाच्या निधीची अफरातफर झाल्याचे चौकशीअंती निदर्शनास आल्याने संबंधित अधिकाऱ्याने ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. तक्रारीनंतर पूर्वीचे ग्रामरोजगार व आताचे नवनियुक्त सरपंच जयपाल दामोधर पारधी यांना अटक केली होती. त्यांना ब्रह्मपुरी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस तपासादरम्यान माजी सरपंच गौतम धोंगडे या माजी सरपंचाचे नाव समोर आल्याने त्यांनाही १३ सप्टेंबरला अटक करण्यात आली आहे. अटकेचे सत्र सुरू असतानाच पुन्हा काही मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यात तत्कालिन ग्रामसेवकालाही अटक होण्याची शक्यता आहे.मजुरांच्या पैशाची अफरातफर, शासनाची फसवणूक हे कारण रक्कमेपेक्षाही मोठे आहे. यापूर्वी पिंंपळगाव (भो.) येथेही असाच प्रकरण उघडकीस आला होता. परंतु मालडोंगरी प्रकरणात जी भूमिका पोलीस विभागाकडून घेतली जात आहे, ती भूमिका पिंपळगाव (भो.) प्रकरणात दिसून आली नाही. त्यामुळे पिंपळगाव येथील रोजगार हमी योजनेचे काम करणाऱ्या महिला वर्गात पोलिसांप्रती प्रचंड नाराजीचा सूर दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)