शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

१५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 05:00 IST

२२ मे २०२० पर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३२ हजार २०६ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण झाले. जिल्ह्यामध्ये १ एप्रिलपासून ३१ मे २०१९ पर्यंत केवळ २७३.८२ लाख कर्ज वाटप झाले. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख ५० हजारांहून अधिक बँक खात्यांची माहिती अपलोड झाली. शासनाने सुरूवातीला कर्जमुक्तीचा तातडीने लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा यंत्रणेकडून ही प्रक्रिया जलदगतीने करून घेतली होती.

ठळक मुद्देकर्जमुक्ती योजनेची गती संथ : बँक खाती निरंक न झाल्याने खरीप कर्जासाठी चकरा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊनमुळे महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण झाल्या, अशा शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची हमी राज्य सरकारने घेऊन खरीप हंगामात बँकांनी पीक कर्ज देण्याचा निर्देश जारी केला. मात्र, आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया रखडल्याने सुमारे १५ हजार शेतकऱ्यांची बँक खाती अद्याप निरंक झाली नाही. त्यामुळे असे शेतकरी खरीप कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.२२ मे २०२० पर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३२ हजार २०६ शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण झाले. जिल्ह्यामध्ये १ एप्रिलपासून ३१ मे २०१९ पर्यंत केवळ २७३.८२ लाख कर्ज वाटप झाले. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे दोन लाख ५० हजारांहून अधिक बँक खात्यांची माहिती अपलोड झाली. शासनाने सुरूवातीला कर्जमुक्तीचा तातडीने लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा यंत्रणेकडून ही प्रक्रिया जलदगतीने करून घेतली होती. टप्प्याटप्प्याने कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्याही प्रकाशित केल्या. मात्र, मार्चच्या अखेरीस कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होताच लॉकडाऊन लागू झाले. परिणामी प्रक्रिया ठप्प झाली. प्रमाणीकरण करण्याचा मूळ उद्देश कर्जखात्यात किती रक्कम थकीत आहे, याची माहिती शेतकऱ्यांना देऊन त्यांची मान्यता घेणे हा आहे. विशिष्ट क्रमांकासह यादीत नाव असलेल्या शेतकऱ्याने नावासमोरील विशिष्ट क्रमाक, आधार क्रमांक व बँक पासबुकसह आपले सरकार सेवा अथवा संबंधित बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.बँकांचा कर्ज प्राधान्यक्रम अन्यायकारकचंद्रपूर जिल्ह्यात कर्जमुक्तीची थंडावली आहे. पात्र असूनही बँकेची खाती निरंक न झाल्याचा फटका शेतकऱ्यांना खरीप हंगामात बसण्याची शक्यता आहे. कर्जमुक्त न झालेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचा आदेश जारी केला. मात्र, जिल्हा मध्यवर्ती व सहकारी बँकांचा अपवाद वगळल्यास राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीक कर्ज देण्याचा प्राधान्यक्रम हा नियमित कर्जदार, कर्जमुक्त झालेला शेतकरी आणि त्यानंतर उर्वरित शेतकरी असा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक कर्जापासून वंचित राहू शकतात.कर्जासाठी आधार प्रमाणिकरण का?आधार प्रमाणीकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकºयाचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक थकीत कर्जाची रक्कम संगणकाच्या स्क्रीनवर दिसते. ही माहिती अचूक व मान्य असेल तर ‘मान्य’ पर्याय निवडून शेतकऱ्यांना आपला आधार प्रमाणिकरण पूर्ण करावा लागतो. त्यानंतरच ही प्रक्रिया अंतिम होते. पीक कर्जासाठी हे प्रमाणीकरण महत्त्वपूर्ण पुरावा आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड