शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

९५० चालक-वाहकांचा रोज २० हजार प्रवाशांशी संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:36 IST

कोरोनामुळे २२ मार्च २०२० पासून एसटी बंद करण्यात आली. त्यानंतर ५० टक्के तत्त्वावर बससेवा सुरू करण्यात आली. आता बंद ...

कोरोनामुळे २२ मार्च २०२० पासून एसटी बंद करण्यात आली. त्यानंतर ५० टक्के तत्त्वावर बससेवा सुरू करण्यात आली. आता बंद असलेल्या बहुतांश बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या, प्रवाशांची संख्याही वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा, चिमूर, राजुरा हे चार आगार असून, या आगारातून सुमारे २२५ बसच्या १४०५ बसफेऱ्या ८० हजार कि.मी. धावतात. ५८३ बसचालक, तर ३६७ वाहक कर्तव्य बजावतात. या वाहक, चालकांचा दररोज सुमारे २० हजारांच्या जवळपास नागरिकांशी संपर्क येतो. मात्र, याची कुठलीही तपासणी होत नसल्याने त्यांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुविधा पुरविणे गरजेचे आहे.

२० हजार प्रवशांचा रोज प्रवास

चंद्रपूर जिल्ह्यात चार आगारांतून २२५ बसेस धावतात. दररोज साधरणत: ८० हजार कि.मी.चा प्रवास करतात. यामध्ये साधरण २० हजारांच्या आसपास प्रवासी प्रवास करीत असतात. चंद्रपूर जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर होणाऱ्या प्रवासी वाहतुकीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रवासी काळजी घेत आहेत. चालक-वाहकसुद्धा आपली काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे.

बॉक्स

तपासणीच नाही

दररोज प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या चालक व वाहकांची राज्य परिवहन महामंडळाकडून कोणतीही तपासणी केली जात नाही. लगतच्या जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तेथील प्रवासी आपल्या जिल्ह्यात येत आहेत. त्यांचा वाहक, चालकांशी संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, याबाबत राज्य परिवहन महामंडळ गंभीर नसल्याचे दिसून येते.

बॉक्स

दररोज प्रवाशांच्या संपर्कात येणाऱ्या आणि फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या एस. टी. चालक वाहकांना लस देण्यात आली नाही. कर्मचाऱ्यांची लस देण्याची मागणी आहे. परंतु, अधिकृतरीत्या मागणीचे निवेदन देण्यात आले नाही. एस.टी. कर्मचाऱ्यांचा अजूनही विचार झालेला नाही. त्यामुळे त्यांना लसीचे संरक्षण अध्याप मिळाले नाही.

बॉक्स

मास्क, सॅनिटायझर नसल्याने गैरसोय

चालकांना मास्क, सॅनिटायझर पुरविल्या जात नसल्याची माहिती आहे. त्यामुळे चालक व वाहकांना स्वत:लाच व्यवस्था करावी लागत आहे. त्यातील काहीजण मास्क वापरताना काहीजण रूमाल वापरताना, तर काहीजण कसलाच वापर करीत नसून त्याच स्थितीत तिकीट फाडताना आढळून येतात.

कोट

दररोज आमचा हजारो नागरिकांशी संपर्क येतो. मात्र, अद्यापही आम्हाला लसीकरण दिले नाही, तसेच मास्क व सॅनिटायझर पुरविले नाही. परजिल्ह्यात बसफेऱ्या धावत असल्याने वाहक, चालकांना लसीकरण गरजेचे आहे.

-दत्ता बावणे,

विभागीय सचिव, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना

----

सुरुवातीला एकादा मास्क दिले तेव्हापासून आतापर्यंत मास्क पुरविले नाही. निर्जंतुकीकरण करण्यात आले. परंतु, दररोज शेकडो लोकांशी संपर्क येत असूनही लसीकरणाबाबत कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही.

संजय सोमनकर

विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटना