शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

८६ टक्के वीज ग्राहकांची मोबाईल नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 22:26 IST

महावितरणच्या मोबाईल अ‍ॅप्सचा राज्यातील ग्राहकांना मोठा लाभ मिळत असून महावितरणच्या कामकाजातही गतीशीलता व पारदर्शकता आली आहे. महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅप्समुळे राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाईन सेवा मिळत आहे. तसेच महावितरणचे कर्मचारी मोबाईल अ‍ॅप्सद्वारे विविध दैनंदिन कामे आॅनलाईन करीत असल्यामुळे महावितरणच्या कामकाजात गतीशीलता व पारदर्शकता आली आहे.

ठळक मुद्देवीज ग्राहक झाले डिजिटल : महावितरणच्या कामातील पारदर्शकता वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महावितरणच्या मोबाईल अ‍ॅप्सचा राज्यातील ग्राहकांना मोठा लाभ मिळत असून महावितरणच्या कामकाजातही गतीशीलता व पारदर्शकता आली आहे. महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅप्समुळे राज्यातील ग्राहकांना तत्पर व आॅनलाईन सेवा मिळत आहे. तसेच महावितरणचे कर्मचारी मोबाईल अ‍ॅप्सद्वारे विविध दैनंदिन कामे आॅनलाईन करीत असल्यामुळे महावितरणच्या कामकाजात गतीशीलता व पारदर्शकता आली आहे.चंद्रपूर परिमंडळांतर्गत येणाऱ्या चंद्रपूर व गडचिरोली मंडलातील एकंदरीत सहा लाख ३२ हजार ४५५ विविध वर्गवारीतील ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे.चंद्रपूर मंडलातील तीन लाख ६९ हजार ७७१ ग्राहकांनी मोबाईल क्रमांकांची नंोदणी केली आहे. तसेच, गडचिरोली मंडलातील दोन लाख ६२ हजार ६८९ ग्राहकांनी मोबाइल क्रमांकांची नंोदणी केली आहे.महावितरणच्या ग्राहकांना मीटररिडींग, वीजबील, आॅनलाईन बील, नवीन वीजजोडणीसाठी अर्ज व त्याची सद्यस्थिती, मीटर वाचन घेतल्याचा आणि देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे इत्यादीबाबतच्या सूचना महावितरणतर्फे एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहेत. या सर्व सेवा ग्राहकांना देण्यासाठी मोबाईल क्रमांकांची नोंदणी करणे आवश्यक आहे.सद्यपरिस्थितीत चंद्रपूर मंडलातील ८७.३९ टक्के तर गडचिरोली मंडलातील ८५.९१ टक्के ग्राहकांनी नोंदणी केली आहे. उर्वरित १४ टक्के ग्राहकांनी नोंदणी केल्यास त्यांनाही या सुविधा एसएमएसद्वारा प्राप्त होणार आहे.आपल्या भागातील रोहित्रात बिघाड झाला असेल किंवा दुरूस्ती कामासाठी वीजपुरवठा ख्ांडित करावयाचा असल्यास त्याबाबत माहिती ही एसएमएसने महावितरणद्वारे देण्याची सुविधा प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या टोल फ्रीक्रमांकावर फोन करून नोंदनी करावी लागेल.