शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

गांधी स्मारकासाठी ७५ वर्षीय शिक्षकाचा लढा

By admin | Updated: October 15, 2016 01:01 IST

सावली गावाला फार पुर्वीपासून ऐतीहासिक वारसा लाभलेला आहे. या गावात अनेक राजकीय नेते, तसेच अनेक थोर नेत्यांनी भेट दिली आहे.

लोकप्रतिनिधींना निवेदन : गडचिरोली ते सावली पदयात्राप्रकाश लोनबले सावलीसावली गावाला फार पुर्वीपासून ऐतीहासिक वारसा लाभलेला आहे. या गावात अनेक राजकीय नेते, तसेच अनेक थोर नेत्यांनी भेट दिली आहे. त्यातीलच एक म्हणजे महात्मा गांधी यांनी सावली गावात दोनदा भेट दिली. तसेच गावात मुक्कामीसुदधा राहीले. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमिला गांधीग्राम म्हणून ओळखावे, व म. गांधीचे राष्ट्रीय स्मारक सावलीत उभारण्यात यावे, यासाठी येथील ७५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर गाडेवार हे प्रयत्न करत आहेत. मात्र त्याच्या लढ्याला अजूनही यश आले नाही. सावलीला गांधी ग्राम म्हणून ओळखण्यात यावे, यासाठी सुधाकर गाडेवार यांच्या नेतृत्वात दोन वर्षापूर्वी गडचिरोली ते सावली अशी पदयात्रा काढली. तसेच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. अहिर, खा. नेते यांना निवेदन सुद्धा देण्यात आले. मात्र अजूनही त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे ७५ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाचा गांधीग्राम बनविण्याचा व राष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी लढा सुरु आहे.म. गांधीची सावलीला प्रथम भेट १४ नोव्हेंबर १९३३ रोजी व द्वितीय भेट २७ फेब्रुवारी १९३६ साली झाली. या काळात सावलीत सुतकताई, सुतापासून खादीचे कपडे बनविण्याचा व्यवसाय सुरु होता. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी म. गांधीनी स्वदेशीचा वापर व विदेशी वस्तूचा त्याग हा मंत्र दिला होता. सावलीत खादीचे कापड तयार होत असल्याने ग्राम स्वराज्य कल्पनेप्रमाणेच्या माध्यमातून खादी ग्रामोद्योग ट्रस्टची स्थापना करण्यात आली. सावलीत नर्मदा प्रसाद अवस्थी यांच्या पुढाकाराने १९२७ ला खादी भांडार केंद्र सुरु झाले. त्यावेळी अवस्थी याच खादी भांडाराच्या पहिल्या व्यवस्थापक बनल्या. यावेळी खादी भांडारचे व्यवस्थापन, विपणन, उत्पादन, विक्री, याची माहिती गांधीजीना वेळोवेळी कळविली जात होती. यांची पाहणी करण्यासाठी व कामगारांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी १४ नोव्हेंबर १९३३ ला गांधीजी सावलीत आले. यावेळी खादी गांधी सेवा संघाचे अधिवेशन निश्चित करण्यात आले. खादी गांधी सेवा संघाचे अधिवेशन २६ फेब्रुवारी ते ५ मार्च १९३६ पर्यंत चालले. डॉ. राजेंद्रप्रसाद, आचार्य विनोबा भावे, डॉ. करिअप्पा, जमनलाल बजाज, सरोजिनी नायडू, सुशिला नायर आदी महान नेते उपस्थित होते. या काळातच पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पत्नी कमला नेहरु याचे निधन झाल्याने अधिवेशन समाप्त करण्यात आले. असा इतिहास सावलीला लाभला आहे. त्यामुळे सावलीला गांधीग्राम म्हणून ओळखण्यात यावे, व म. गांधीचे राष्ट्रीय स्मारक बांधण्यात यावे, यासाठी सुधाकर गाडेवार व त्याचे सहकारी यांचा लढा सुरुच आहे.हा लढा यशस्वी होणार का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.