शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणबाळ संजय गांधी योजनाचे ७५ लाभार्थी अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:41 IST

बल्लारपूर : वय कमी, कमावती मुले, सधन परिस्थिती व विविध कारणाने तहसील कार्यालयात झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना ...

बल्लारपूर : वय कमी, कमावती मुले, सधन परिस्थिती व विविध कारणाने तहसील कार्यालयात झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत सादर केलेल्या २५६ लाभार्थ्यांच्या प्रकरणातून १८१ लाभार्थी पात्र ठरविण्यात आले तर ७५ लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आले.

सध्या बोगस कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांचा शोध घेतल्या जात आहे. यामुळे आता बोगस लाभार्थ्यांची खैर नाही. बल्लारपूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे दोन हजार ४८९ लाभार्थी आहेत. तर श्रावणबाळ योजनेचे २ हजार ७८८ लाभार्थी आहेत. तहसील कार्यालयाकडून प्रत्येक लाभार्थ्यांना महिन्याला १ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जातात.

पात्र ठरलेले लाभार्थी

मंजूर लाभार्थ्यांमध्ये विसापूर, दहेली, मानोरा, इटोली, बामणी, किन्ही, पळसगाव, हडस्ती, कवडजई, कळमना, कोठारी व बल्लारपूर येथील श्रावणबाळ व वृद्धापकाळ योजनांमधील ८२ जणांची यादी मंजूर करण्यात आली आहे. तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील ९९ लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये अपंग २२ व ६ अविवाहित महिला, कॅन्सर रुग्ण १, घटस्फोट १,टीबी १, दुर्धर आजार ४, परितक्ता ७, विधवा ५३ व सिकलसेलच्या ४ लाभार्थ्यांना पात्र ठरविण्यात आले तर बैठकीत श्रावणबाळ योजनेचे ५२ व संजय गांधी निराधार योजनाचे २३ लाभार्थ्यांची कागदपत्रे विविध कारणाने नामंजूर करण्यात आल्याचे लिपिक सुनील दडमल यांनी सांगितले.

कोट

ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांकडून नव्याने ८० अर्ज आले असून तलाठ्यांच्या माध्यमातून त्यांची पडताळणी करणे सुरू आहे. ते मंजुरीसाठी मार्चच्या बैठकीत ठेवण्यात येतील.

- संजय राईंचवार, तहसीलदार, बल्लारपूर.