शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

लोकवाहिनीचा ७० वर्षांचा निरंतर प्रवास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:12 IST

‘प्रवाश्याच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांना सुरक्षित पोहचविणाऱ्या राज्य परिवहन महामडळाने १ जून रोजी ७० वर्षे पूर्ण करीत ७१ वर्षात पदार्पण केले आहे.

ठळक मुद्देखासगी वाहतुकीच्या आक्रमणानंतरही अस्तित्व कायम

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ‘प्रवाश्याच्या सेवेसाठी’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांना सुरक्षित पोहचविणाऱ्या राज्य परिवहन महामडळाने १ जून रोजी ७० वर्षे पूर्ण करीत ७१ वर्षात पदार्पण केले आहे. महामंडळाकडून प्रवाशांना विविध सवलती दिल्या जात असल्याने आजच्या खासगी वाहतुकीच्या स्पर्धेतही महामंडळाची लालपरी लोकवाहिनी चांगलाच तग धरत सोबतीला शिवशाही बससह ७० वर्षांनंतरही निरंतर सेवा देत आहे.१ जून १९४८ मध्ये राज्य शासनाने परिवहन खात्यातंर्गत प्रवाशी वाहतूक सेवा सुरू केली आहे. पहिली बस सेवा पुणे ते अहमदनगर या मार्गावर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आजतागायत ही सेवा प्रवाशांना सुरक्षित आपल्या स्थळी पोहचवित आहे. दिवसेंदिवस सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे.महामंडळाच्या सेवेत खासगी प्रवाशी वाहतूक अडथळा ठरत आहे. खासगी वाहने आकर्षक व आरामदायक आहे. विशेष म्हणजे, कमी वेळेत जाण्यासाठी अनेक प्रवाशी आकर्षित होत आहेत. हा प्रवास शहरी भागात बºयापैकी सुरु आहे. या खासगी वाहतुकीच्या तोडीसाठी एस. टी. महामंडळानेही शिवशाही बसचा ताफा लालपरीच्या दिमतीला आणला आहे. समाजातील ३३ विविध घटकांना प्रवास भाड्यात १० ते १०० टक्के सवलत देण्यात येते. त्याचप्रमाणे त्रैमासिक पास, आवडेल तिथे प्रवास योजना सवलतीच्या दरात दिली जाते. मात्र बदलत्या काळानुसार अत्याधुनिक तिकीट, संगणकीय प्रणाली, संगणकीय आरक्षण प्रणाली, मोबाईल आरक्षण, वाय-फाय आदी सेवा सुरू केल्या आहेत. अपघात सहायता निधी अंतर्गत अपघातात दुर्देवाने प्रवाशी मृत झाल्यास १० लाख रुपये तर जखमींना पाच लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाते. या सर्व सवलतीमुळे एस.टी. आजही ग्रामीण भागात सर्वांची आवडती आहे. एस.टी.ने आज पूर्ण महाराष्ट्रातील मार्ग व्यापले आहेत.ग्रामीण भागात भरवशाची सेवाग्रामीण भागातील प्रवाशांची गरज भागवते ती लोकवाहिनी. त्यामुळे ग्रामीण भागात एस टी. ला जीवन वाहिनी संबोधले जाते. महामंडळाकडून प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्राच्या प्रगतीत महामंडळाचा सिहांचा वाटा आहे.