शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

७० गावकऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल

By admin | Updated: September 11, 2015 01:24 IST

सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान गावकऱ्यांनी पोलीस व प्रशासनाविरूद्ध नारेबाजी करीत ...

वासेरा ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद : जमाव पांगविण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमारसिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीदरम्यान गावकऱ्यांनी पोलीस व प्रशासनाविरूद्ध नारेबाजी करीत गोंधळ घातल्याने या निवडणुकीला चांगलेच गालबोट लागले. याप्रकरणी ७० जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशिल समजल्या जाणाऱ्या वासेरा ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. यावेळी निवडून आलेल्या दोन्ही गटांकडून सरपंच व उपसरपंचपद काबिज करण्यासाठी बरीच रस्सीखेच सुरू झाली. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही गटांच्या समर्थनार्थ शेकडो नागरिक ग्रामपंचायत कार्यालयावर चालून गेले. त्यामुळे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली. वरिष्ठांनी त्वरित चंद्रपुरातून दंगा नियंत्रण पथक वासेरा येथे पाठविले. दंगा नियंत्रण पथक दाखल होऊनही नागरिक जुमानत नसल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यामुळे पळापळ सुरू झाली. दरम्यान, नागरिकांनी पोलीस व प्रशासनाविरूद्ध घोषणाबाजी करून जमावबंदीचे उल्लंघन केले.निवडणुकीदरम्यान गैर कायद्याची मंडळी जमवून पोलीस व प्रशासनाविरूद्ध नारेबाजी व घोषणा देत शिवीगाळ करणे व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्यामुळे पोलीस प्रशासनाने संदीप बोरकर, वामन बोरकर, अशोक बोरकर, पिंटू बन्सोड, चंदू बोरकर, लोकनाथ बोरकर, किशोर बन्सोड, कैलास बोरकर, महादेव बोरकर, मुरलीधर बोरकर, किशोर बोरकर, विष्णू बोरकर, श्यामराव आत्राम, महेश बोरकर, धनराज बोरकर, जितेंद्र मेडीवार, संजय बोरकर या २० प्रमुख नागरिकांसह एकुण ७० जणांविरूद्ध कलम १४३, १४७, ३२३, १८६, १८८ भादंवि १३५, मु.पो.का. अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. वासेरा येथे मंगळवारपासून तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक मंगळवारी झाली असली तरी बुधवारीही गावात संचारबंदीसारखी परिस्थिती होती. सर्वत्र शुकशुकाट दिसून येत होता. दरम्यान, या प्रकारानंतर गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. (शहर प्रतिनिधी)