शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

६०० जिल्हा परिषद शाळांना संगणक देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 01:56 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत ...

सुधीर मुनगंटीवार : राजुऱ्यात जिल्हास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन राजुरा : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे यासाठी जिल्हा वार्षीक योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ६०० जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त व नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.राजुरा येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय बालक्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, माजी आमदार एकनाथराव साळवे, आ. संजय धोटे, माजी आमदार अतुल देशकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, संजय गजपूरे, जिल्हा परिषद सभापती सरिता कुडे, पंचायत समितीच्या सभापती निर्मला कुळमेथे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे, जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे, शांताराम चौखे, अल्का आत्राम, यशवंत ताडाम, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, उपविभागीय अधिकारी गोयल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. शिक्षकांच्या समस्या व विविध प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शिक्षक अदालत आयोजित करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात ही शिक्षक अदालत शिक्षण संचालकांच्या स्तरावर घेण्यात येईल व त्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनासुध्दा शिक्षक अदालतीसाठी आमंत्रीत करण्यात येईल, असे ना. मुनगंटीवार यावेळी बोलताना सांगितले. प्रास्ताविक शिक्षण सभापती देवराव भोंगळे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध जि.प. शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. बालकांच्या स्पर्धेचा नागरिकांनीही आनंद घेतला. (शहर प्रतिनिधी)