शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

६०० प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलिचा ठेंगा

By admin | Updated: January 24, 2016 00:51 IST

चंद्रपूर तालुक्यातील सिनाळा आणि भटाळी या गावातील सुमारे ६०० प्रकल्पग्रस्त शेतकरी सध्या वेकोलिच्या बेमुर्वतपणाचा अनुभव घेत आहेत.

१५० कोटींचा मोबदला थकीत : नरेश पुगलियांनी दिला आंदोलनाचा इशाराचंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील सिनाळा आणि भटाळी या गावातील सुमारे ६०० प्रकल्पग्रस्त शेतकरी सध्या वेकोलिच्या बेमुर्वतपणाचा अनुभव घेत आहेत. या दोन्ही गावांमिळून एक हजार ८०० एकर शेतीचे मालक असलेले शेतकरी वेकोलिच्या नाठार भूमिकेमुळे हतबल झाले आहेत. दरम्यान, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढावू भूमिका घेतली असून शेतकऱ्यांना १५० कोटींहून अधिक सव्याज मोबदला आणि नोकरी न दिल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या एका पत्रकार परिषदेत भटाळी आणि सिनाळा येथील शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. या संदर्भात माहिती देताना पुगलिया म्हणाले, भटाळी आणि सिनाळा येथील शेतकऱ्यांचा वेकोलिसोबत भूमी अधिग्रहणासाठी करार झाला आहे. या दोन्ही गावांमिळून अनुक्रमे ७०० आणि ११०० एकर शेतजमीन आहे. या शेतीची किंमत सुमारे दिडशे कोटी रूपये आहे. भटाळीतील शेतकऱ्यांसोबत १८ महिन्यांपूर्वी तर सिनाळातील शेतकऱ्यांसोबत वर्षभरापूर्वी वेकोलिने करार केला आहे. शासनाच्या धोरणानुसार, वेकोलिने प्रकल्पग्रस्तांना नोकरीची हमी दिली होती. करार करताना तत्परता दाखविणारे वेकोलिचे अधिकारी आता प्रत्यक्षात मोबदला देताना मात्र मागेपुढे पहात आहेत. प्रकल्पग्रस्त युवक नोकरीची वाट बघत आहेत. शेतीचा पुरेसा मोबदला न मिळाल्याने या शेतकऱ्यांचे खरेदी व्यवहारही अडले आहेत. अनेकांच्या तर इसाराची रक्कमही बुडाली आहे. वेकोलि अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवूनही न्याय मिळाल्याने हे शेतकरी आता हतबल झाले आहेत.दुसरीकडे नोकरीची प्रतीक्षा करीत युवकांचे वय वाढत जात आहे. वय झाले असतानाही बेरोजगार म्हणून वावरावे लागत असल्याने तेदेखील आता त्रस्त झाले आहेत.एवढ्या दिवसानंतरही मोबदला मिळाला नसल्याने आता वेकोलिने व्याजासह रक्कम द्यावी, अशी मागणी नरेश पुगलिया यांनी यावेळी केली. या शेतकऱ्यांच्या हालाखीच्या परिस्थितीला केवळ वेकोलि जबाबदार असून त्यांनी यावर तात्काळ मार्ग काढावा, अन्यथा विदर्भ किसान कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक आर.के. मिश्रा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोळसामंत्री पीयूष गोयल, कांग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण आदींना या शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)बागायती शेती दाखविली कोरडवाहूमागील १० ते १२ वर्षांंपासून बागायती शेती, फळशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची शेतजमीन कोरडवाहू दाखविण्याचा प्रताप वेकोलिने केला आहे. कमी मोबदला देणे हा त्यामागील उद्देश असल्याचा आरोप या शेतकऱ्यांचा आहे. अनेकांच्या शेतात बोअरवेल, विहिरी आहेत. संत्रा, चिक्कू, पेरू, फणस, लिंबांची झाडे आहेत. एकरी लाखो रूपयांचे उत्पन्न घेणारे शेतकरी वेकोलिच्या धोरणामुळे धास्तावले आहेत. मुकूंद आंबेकर, शरद राजणे यांच्यासह अनेक शेतकरी चिंतेत पडले आहेत. राज्य सरकारच्या निकषानुसार पुनर्वसानाचे धोरण राबवावे, अशी मागणी असली तरी नवे सरकार अन्यायच करत असल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे.