शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

५८ दिवसांच्या आंदोलनाची फलश्रुती

By admin | Updated: March 10, 2016 01:15 IST

वनशास्त्र पदवीधारकांना वनविभागातील सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी पदभरतीत १०० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी....

विद्यार्थी जिंकले : राज्यभरातून आलेले विद्यार्थी स्वगावी रवानाचंद्रपूर : वनशास्त्र पदवीधारकांना वनविभागातील सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी पदभरतीत १०० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चंद्रपुरात येऊन आंदोलन छेडले. सलग ५० दिवस साखळी उपोषण व त्यानंतर आमरण उपोषण केले. यादरम्यान चार विद्यार्थ्यांची प्रकृतीही खालावली. तरीही विद्यार्थी मागे हटले नाही. अखेर उपोषणाच्या आठव्या दिवशी शासनाने त्यांना ठोस आश्वासन देऊन शासन निर्णयासाठी अवधी मागितल्यानंतर आंदोलन आज बुधवारी मागे घेण्यात आले. मागील ५८ दिवसांपासून निश्चल उभा असलेला त्यांचा उपोषण मंडप आज काढण्यात आला आणि राज्यभरातून आलेले हे आंदोलक विद्यार्थी आपापल्या गावी रवाना झाले.राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि डॉ. बा.सा.को. कृषी विद्यापीठ दापोली या दोन विद्यापिठांतर्गत प्रत्येकी एक असे एकूण दोन वनशास्त्र पदवी अभ्यासक्रमाचे महाविद्यालये आहेत. यातील प्रत्येक महाविद्यालयावर महाराष्ट्र शासनाचा दोन कोटी रुपयांचा खर्च होतो. यासोबतच भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि भारतीय वानिकी अनुसंधान व शिक्षा परिषद देहरादून यांचेही वित्तीय सहाय्य महाविद्यालयांना मिळते. वनशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये ४९ वनासंबंधित विषयाचा सखोल अभ्यास केला जातो. एवढेच नाही तर वनविभागद्वारे वनकार्यानुभव (सहा महिने) आणि वनशास्त्र महाविद्यालयाद्वारे वनव्यवसायिक प्रशिक्षण (सहा महिने) दिले जाते. असे असतानाही वनशास्त्र पदवीधारकांना वनविभागातील सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी या पदाच्या भरतीमध्ये केवळ पाच टक्के आरक्षण दिले जात आहे. त्यामुळे शासनाचा एवढा खर्च होऊन तयार झालेल्या विद्यार्थ्यांना बेरोजगार रहावे लागते. परिणामी या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना संबंधित पदभरतीत १०० टक्के जागा आरक्षित करून सरळ सेवा भरतीद्वारे नियुक्ती करावी, अशी मागणी करीत राज्यभरातील पदवीधारक विद्यार्थ्यांनी वनमंत्र्यांच्या चंद्रपूर शहरात आंदोलन उभे केले. १२ जानेवारीपासून येथील मध्यवर्ती सहकारी बँकेसमोरील परिसरात त्यांनी साखळी उपोषण सुरू केले. आंदोलनाची दखल घेतली जाईल, अशी आशा होती. मात्र तसे झाले नाही आणि साखळी उपोषण वाढत गेले. तब्बल ५० दिवस हे आंदोलन सुरूच होते. साखळी उपोषणाचे ५० दिवस पूर्ण झाल्यानंतरही शासन दखल घेत न नसल्याने या विद्यार्थ्यांनी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ मार्चपासून रोहित लांबे, नागेश डोंगरे, अक्षय पवार, महेश काकडे, हरीश गजभिये, पंकज लोनकर आणि सद्दाम हुसेन संदे हे आठ विद्यार्थी बेमुदत उपोषणाला बसले. दरम्यान, पाचव्या दिवशी चार विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. सद्दाम हुसेन संदे या विद्यार्थ्याला तर दवाखान्यात दाखल करण्यात आले. आज बुधवारी आमरण उपोषणाचा आठवा दिवस होता. आंदोलन चिघळत जाण्याचे चिन्ह दिसू लागले होते. दरम्यान, शासनाने आंदोलनाची दखल घेत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मागितला. त्यामुळे आंदोलन तुर्तास मागे घेण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला. आज तहसीलदार गणेश शिंदे व प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. (शहर प्रतिनिधी)