शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

१५ रुपयाच्या मीटरला ५०० रुपयांचे बिल

By admin | Updated: July 16, 2015 01:25 IST

गोरगरिबांच्या अंधार असलेल्या घरात उजेड पडावा, यासाठी शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली राजीव गांधी विद्युतीकरण योजना

लाभार्थी त्रस्त : गरिबांच्या घरी अंधारातच अंधारपिंपळगाव : गोरगरिबांच्या अंधार असलेल्या घरात उजेड पडावा, यासाठी शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली राजीव गांधी विद्युतीकरण योजना हजारो लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरु लागली आहे. या योजनेत मिळालेल्या १५ रुपयाच्या मिटरला ५०० रुपयाचे बिल महिन्याकाठी येत असल्याने आता पोटाची खडगी भरावी की, वीज बिलाचा भरणा करावा, असा गंभीर प्रश्न अनेक गरीब कुटुंबीयांना पडला आहे.अवाजवी बिल येत असल्याने लाभार्थ्यांना बील भरणे कठीण जात आहे. त्यामुळे महावितरण वीज कापणार असल्याने गरिबांना पुन्हा अंधारात जीवन काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही योजना गरिबांना ‘चार आण्याची कोंबडी अन् बारआण्याचा मसाला’ अशीच ठरली आहे.गोरगरिबांच्या अंधार पसरलेल्या घरात उजेड पडावा, यासाठी मोठा गाजावाजा करुन शासनाने राजीव गांधी विद्युतीकरण योजना सुरु केली. १५ रुपयात गरीबाच्या खोलीत विजेचा लख प्रकाश पसरावा म्हणून ही योजना कार्यान्वित केली. जिल्ह्यातील हजारो गरिबांनी या योजनेचा लाभ घेवून आपल्या घरात विजेचा लख प्रकाश पडला. परंतु यातील किती लाभार्थी खरे व किती खोटे हा संशोधनाचा विषय ठरला. मात्रा अवाजवी बिलामुळे ही योजना आता डोकेदुखी ठरली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना १५ रुपयात मीटर विजेची जोडणी व चार व्हॅटचा एक सीएफएल दिवा देण्यात आला होता. शिवाय एक ते तीन युनिट पर्यंत बिलात सवलत देण्यात आली होती. परंतु ३० युनिटच्या वर वापर केल्यास लाभार्थ्यांना सर्वसामान्य ग्राहकासारखा बिल लावण्यात येईल असे निकष ठेवण्यात आले. वास्तविक पाहता आज विज्ञान युगात कितीही गरीब असला तरी त्याच्या घरात टीव्ही व फॅन या सारख्या चैनीच्या वस्तू असतात. त्यामुळे हजारो लाभार्थ्यांचे युनिट ३० च्या वर जात आहेत. त्यामुळे काही लाभार्थ्यांना तर ५०० रुपयावर बिल येत आहे. हे वाढीव बिल पाहूण गरीब लाभार्थ्यांच्या मनात धडकी भरत असून कितीही तक्रारी करुन काहीच त्यांच्यावर मार्ग निघत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत. कर्मचारी मात्र निकष दाखवून त्यांची बोळवण करीत आहेत. या बिलामुळे पोटाची खडगी भरावी की वीज बिल भरावे असा गंभीर प्रश्न गरीब लाभार्थ्यांसमोर टाकला आहे. वीज बिलाचा भरणा न केल्यास कनेक्शन कापल्या जाईल या भीतीने अनेक लाभार्थी नाईलाजास्तव पोटाचा चिमटा घेऊन वीज कंपनीची तिजोरी भरीत आहे. गोरगरिबांच्या हितासाठी योजनेचे निकष शिथिल करुन वापराच्या युनिटमध्ये वाढ करण्याची मागणी आहे. (वार्ताहर) सामान्य ग्राहकांनाही फटकावीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे सामान्य ग्राहकांनाही फटका सहन करावा लागत आहे. अनेक ग्राहकांचा वापर नसतानाही अवाजवी वीज बिल पाठविले जात असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. त्यामुळे वीज वितरणच्या कारभाराप्रति तिव्र असंतोष पसरला असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.