शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहात ५० लाखांचे साहित्य धूळ खात

By admin | Updated: September 27, 2015 00:51 IST

राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती आणि गोंडपिपरी तालुक्यातील आदिवासींच्या मुलांसाठी १५० विद्यार्थी क्षमतेचे दोन आदिवासी मुलांचे वसतिगृह सुरू झाले.

आदिवासी मुलांचे वसतिगृह : सोई-सुविधांअभावी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे हाल, अभ्यासावरही विपरीत परिणामलोकमत आॅन द स्पॉटबी.यु. बोर्डेवार राजुराराजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती आणि गोंडपिपरी तालुक्यातील आदिवासींच्या मुलांसाठी १५० विद्यार्थी क्षमतेचे दोन आदिवासी मुलांचे वसतिगृह सुरू झाले. आज या वसतिगृहाला भेट दिली असता सोई-सुविधांपासून मुले वंचित असल्याचे दिसून आले. येथील बहुतेक साहित्य बंद असून धूळ खात आहेत.या वसतिगृहामधील मुलांसाठी दहा लाखाचे दोन जनरेटर घेण्यात आले आहेत. मात्र ते जनरेटर मागील तीन वर्षापासून बंद आहे. मुलांना गरम पाणी मिळावे, यासाठी सोलर सिस्टीम वसतिगृहाच्या वर बसविण्यात आले होते. तेदेखील बंद आहे. या वसतिगृहातील मुलांना संगणकाचे ज्ञान मिळावे, यासाठी दहा संगणक संच आहेत. मात्र प्रस्तुत प्रतिनिधीने या वसतिगृहात भेट दिली असता हे सर्वच संगणक संच बंद असल्याचे दिसून आले.लायब्ररी तर अजूनपर्यंत उघडलीच नाही. या ठिकाणी मुलांना आंघोळीसाठी जे नळ आहेत, तेदेखील बंद आहे. मुलांना दरमहा मिळणारा ५०० रुपये भत्ता चार महिन्यापासून बंद आहे. अर्धे सत्र संपले तरी ड्रेसचे पैसे मिळाले नाही. नोटबुक मिळाले नाही. या वसतिगृहात गरीब आदिवासी मुलांची थट्टा चालविली जात आहे. त्यामुळे याला जबाबदार प्रकल्प अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची गरज आहे. वसतिगृह क्रमाक दोन मध्ये सात बाथरूम आहेत. त्यापैकी दोन सुरू आहे. इतर बाथरूममध्ये पाणीच येत नाही. १९८२ मध्ये सुरू झालेले हे वसतिगृह ३३ वर्षानंतर अनेक समस्यांच्या विळख्यात आहे. या ठिकाणी एकही साहित्य व्यवस्थित नाही. हे वसतिगृह आहे की आदिवासी मुलांची थट्टा करणारे केंद्र आहे हेच कळायला मार्ग नाही. या ठिकाणी अधीक्षक आहे पण कधीकधीच उपस्थित असतात. १५० आदिवासी मुलांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे.३० सप्टेंबरला विद्यार्थ्यांचे उपोषणवसतिगृहातील या दुरवस्थेकडे येथील विद्यार्थ्यांनी वारंवार वरिष्ठांचे लक्ष वेधले. मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता विद्यार्थी संतापले आहेत. वसतिगृहापुढेच ३० सप्टेंबरला सकाळी १० वाजतापासून विद्यार्थी विविध मागण्यासाठी उपोषणाला बसणार आहे.