शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

४६७ कामगारांच्या आयुष्यातील ‘ते’ ३६५ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2016 05:20 IST

एक चांगलं आयुष्य जगण्याची आस घेवून बरांज कोळसा खाणीत नोकरीला लागलो. तांत्रिक कारणामुळे कोळसा खाण बंद झाली.

सचिन सरपटवार ल्ल भद्रावतीएक चांगलं आयुष्य जगण्याची आस घेवून बरांज कोळसा खाणीत नोकरीला लागलो. तांत्रिक कारणामुळे कोळसा खाण बंद झाली. आमचे पगार बंद झाले. राहात असलेल्या क्वॉर्टरमधील वीज अन् पाण्याचे कनेक्शन कापण्यात आले. पैशाची अडचण भासू लागली. उदरनिर्वाह कसा करावा, हे समजेनासे झाले. घरातील वस्तू विकाव्या लागल्या. दुध बंद केले. पोरांच्या शाळा बंद झाल्या. ठेल्यावर मुंगफल्ली विकणे सुरू केले. दारोदारी कपडे विकू लागलो. शेतमजुरीच्या कामाला जावू लागलो. गाव सोडण्याचा विचार डोक्यात येवू लागला. अनेक आंदोलने केलीत उपयोग झाला नाही. आयुष्याचाच कोळसा होतो की काय याची भिती वाटू लागली. आयुष्यात स्वप्न पाहली होती. पण आज कंपनीच्या धोरणामुळे कुठे आयुष्य गेलं, असे म्हणण्याची वेळ आली. या भावना आहेत. त्या ४६७ कामगारांच्या, ज्यांचा ३६५ पेक्षा अधिक दिवस होवूनही पगार बंद आहे. या ३६५ दिवसांत प्रत्येक दिवशी त्यांनी मरणयातना भोगल्या.बरांज (भो) स्थित कर्नाटका एम्टाची खुली कोळसा खाण गेल्या १ एप्रिल २०१५ पासून बंद आहे. आज एक वर्षे झाले. प्रशासकीयस्तरावर बैठका झाल्या. आश्वासने दिलीत. परंतु काहीही उपयोग झाला नाही. मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा झाली. पण त्याचे अजुनही काही फलीत निघाले नाही.या वर्षभरात आपल्या न्याय मागण्यासाठी प्रकल्पग्रस्त कामगारांनी विविध आंदोलन केलीत. सर्वात प्रथम टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आले. नंतर चंद्रपूरपर्यंत पायदळ यात्रा, भिक मांगो आंदोलन व दहा दिवसांचे जेल भरो आंदोलन प्रकल्पग्रस्त राजू डोंगे यांच्या नेतृत्वात कामगारांनी केली. तरीही प्रशासनाचे डोळे उघडले नाही. या सर्वच आंदोलनात रामा मत्ते, रवींद्र डोंगे, निलेश रामटेके, प्रभाकर कुळमेथे, संदीप घुगुल, पांडूरंग सातपुते, मोहन दरेकर, दिनेश वानखेडे, अरविंद देवगडेव अन्य कामगारांचा सहभाग होता. शेतजमिनही गेली व पगारही नाही अशा बिकट संकटात आज हे कामगार सापडले आहेत.सध्या सदर खाण पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली दिसत आहे. परंतु जोपर्यंत केपीसीएलच्या आस्थापनेवर होणार नाही तोपर्यंत खाणीचे काम सुरू करू नका अशी राजू टोंगे यांची मागणी आहे.