शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

४,६१९ शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना बसणारा फटका नित्याची बाब झाली आहे. तरी या तालुक्याला सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या  गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या आसोला मेंढा प्रकल्प व उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील बहुतांश भागातील धान लागवडीखालील क्षेत्रात यावर्षी सिंचनासाठी पाणी मिळाले. सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत होते.

दिलीप फुलबांधेलोकमत न्यूज नेटवर्कगेवरा:  सावली तालुक्यातील खरीप २०२१ या वर्षीच्या धान उत्पादक शेतकऱ्यांचे हजारो हेक्टरवरील धान पिकाचे  कापणीपूर्व व कापणीनंतर अवकाळीच्या अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर  शासन व जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन संबंधित यंत्रणेमार्फत पंचनामे करण्यात आले होते. यातील चार हजार ६१९ शेतकऱ्यांना आता पीक विम्याची प्रतीक्षा आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना बसणारा फटका नित्याची बाब झाली आहे. तरी या तालुक्याला सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या  गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या आसोला मेंढा प्रकल्प व उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील बहुतांश भागातील धान लागवडीखालील क्षेत्रात यावर्षी सिंचनासाठी पाणी मिळाले. सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत होते.धान पीक हातात आलेले असतानाच कापणी बांधणीदरम्यान अनेकदा अतिवृष्टी होऊन धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले. काही भागातील धानाच्या सरड्या वाहून गेल्या. प्रचंड मनस्ताप सहन करीत तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. शासन व  विमा कंपन्यांनी शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे व सर्वेक्षण केले.जिल्हा प्रशासनासह राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे,मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शासकीय सर्व सोपस्कार आटोपले असले तरी शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेतच आहेत.खरीप २०२१-२२ या वर्षात सावली तालुक्यातील २८ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी २३ हजार ९५८ हेक्टरवर भात पिकाची लागवड केली होती,यापैकी चार ६१९ एवढ्या भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. या शेतकऱ्यांना आता विम्याची रक्कम हवी आहे.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा