शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्याकडे जाणाऱ्या ४६ जनावरांची सुटका

By admin | Updated: May 9, 2017 00:36 IST

पडोली आणि भद्रावती येथे ट्रकमधून कत्तलखान्यात नेणाऱ्या ४६ जनावरांची सुटका करून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस / भद्रावती : पडोली आणि भद्रावती येथे ट्रकमधून कत्तलखान्यात नेणाऱ्या ४६ जनावरांची सुटका करून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. पडोली चौकात नागपूरकडून येणाऱ्या ट्रकची (क्र. एमएच ४० एके ५९४५) झडती घेतली असता त्यात २५ जनावरे कत्तलखान्याकडे नेत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी तिघांना अटक केली असून जनावरांची सुटका करण्यात आली. सदर कारवाई आज सोमवारी करण्यात आली. सुखवंत सिंग गजनसिंग बाजवा, अरबाज अब्दुल हरबज गबार शेख रा. नागपूर अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी दोन ट्रकमधून जाणारी ४० जनावरे आणि त्यापूर्वी २० जनावरांची पडोली पोलिसांनी सुटका करून आरोपींना अटक केली होती.दुसऱ्या घटनेत एका १२ चाकी ट्रकमध्ये कोंबून नेत असलेल्या २१ बैलांची सुटका करण्यात भद्रावती पोलिसांना यश आले. ही कारवाई रविवारी रात्री ११ वाजता गस्तीवर असताना करण्यात आली. याप्रकरणी ट्रक चालक मजींदरसिंग हरदीपसिंग राय, नहीम कुरेशी रहिम कुरेशी, अफ्रीज अब्दुल व ट्रक मालक अजमेरसिंग गिल सर्व रा. नागपूर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध कलम ५(१), ५(ब), ९, ११ महराष्ट्र संरक्षण अधिनियम २०१५ तसेच सहकलम ११(१)(ड) भारताचा प्राण्यास निर्दयीपणे वागविणे प्रतिबंधक अधिनियम १९६० नुसार गुन्हा दाखल करण्यात आली. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गजभिये यांच्यासह पोलीस ताफ्याने केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गजभिये हे गस्तीवर असताना त्यांना खबऱ्यामार्फत पोलीस नियंत्रण कंक्षामार्फत मिळालेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली.