शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कोड मागून ४२ हजारांनी फसवणूक

By admin | Updated: May 18, 2017 01:12 IST

सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा आत्महत्या व कर्जमाफी हा विषय ऐरणीवर असताना कोणीही शेतकऱ्यांना आधार देण्यास तयार नाही.

शेतकऱ्याला फटका : कापूस विकून बँकेत टाकले होते पैसे लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा आत्महत्या व कर्जमाफी हा विषय ऐरणीवर असताना कोणीही शेतकऱ्यांना आधार देण्यास तयार नाही. अशा परिस्थिती शेतात वर्षभर राबून परिश्रमातून आपल्या वर्षभर आपले घर चालेल इतकी रक्कम जमा करून बँकेत ठेवली. परंतु या शेतकऱ्याला ‘तुमचे ए.टी. एम. बंद झाले आहे’, असे फोनवरून सांगून एका भामट्याने त्याच्या बँक खात्यातून चक्क ४२ हजार रुपये लंपास केल्याचे बुधवारी उघडकीस आले. भद्रावती तालुक्यातील कारेगाव येथील नरेश कमलाकर लभाने (४०) यांचे वरोरा येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या बचत खाते आहे. त्यांच्याकडे बँकेचे एटीएमहीे आहे. ते बुधवारी हा काही कामानिमित्त भद्रावती येथे गेले होते. आपले काम आटोपल्यावर ते वरोरा येथे राहत असलेल्या बहिणीकडे जाण्यास एसटीमध्ये बसताच त्यांना एक अनोळखी क्रमांकावरून फोन आला. ‘मी मुंबई येथील कार्यालयातून बोलत असून तुमच्याकडे असणारे एटीएम बंद झाले आहे’, असे तो सांगू लागला. त्यावर नरेश लभाने यांनी ते सुरू करून देण्यास सांगितले. तेव्हा त्याला एटीएम काढून आधी त्यावरील अंक आणि पैशाबाबत विचारणा केली. या भोळ्या शेतकऱ्याने त्याला सर्वच सांगितले. ही सर्व प्रक्रिया झाल्यावर ‘तुमच्या मोबाईलवर एक एस. एम. एस. येईल. तो मला सांगायचा आणि लगेच तुमचे एटीएम सुरु होईल’, अशी बतावणी केली. त्यानंतर लभाने यांना चार वेळा थोडे-थोडे करीत ४२ हजार रुपयांनी गंडविण्यात आले. काही वेळानंतर लभाने यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी वरोरा येथील स्टेट बँक गाठली. तेथे एटीएम ब्लॉक केले. त्यानंतर वरोरा पोलीस ठाण्यात या फसवणुकीची तक्रार दाखल केली. शेतकऱ्यांना डिजिटल सेवेबद्दल जागृतीची गरज केंद्र सरकारने जुन्या ५०० व १०००च्या नोटा बंद केल्या आहेत. पंतप्रधान यांनी जनतेला आॅनलाईन व्यवहार करण्यावर भर देण्यास सांगितले आहे. पण पाहिजे तेवढी संगणक साक्षरता नसल्याने आणि शासनाने जागृती न केल्याने नरेश लभाने यांच्यासारखे अनेक शेतकरी हॅकर्सच्या बतावणीला बळी पडत आहेत.