शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

३५ हेक्टर जंगल जळाले

By admin | Updated: April 17, 2016 00:43 IST

मागील काही दिवसात वरोरा वनपरिक्षेत्रातील टेमुर्डा उपवनक्षेत्रातील जंगलात आग लागली होती.

सालोरी मेसा जंगलातील घटना : वन्यप्राण्यांचे इतरत्र स्थलांतरणवरोरा : मागील काही दिवसात वरोरा वनपरिक्षेत्रातील टेमुर्डा उपवनक्षेत्रातील जंगलात आग लागली होती. त्यानंतर वरोरा वनपरिक्षेत्रातील सालोरी मेसा गावानजीकच्या ३५ हेक्टर जंगलात आग लागल्याने वनविभागाचे मोठ्या प्रमाणाम नुकसान झाले आहे. जंगलातील आगीमुळे वन्यप्राण्यांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतरण करणे सुरू केल्याने वन्यप्राणी जंगला नजीकच्या गावात शिरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वरोरा चिमूर मार्गा लगतच्या सालोरी जंगलातील कक्ष क्रमांक १२ मध्ये १५ एप्रिलच्या पहाटे आग लागली. पहाटेची घटना असल्यामुळे ही आग वाढत कक्ष क्रमांक ९२७ मेसापर्यंत पोहचली. आग लागल्याची माहिती वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी सकाळीच घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने जंगलातील ३५ हेक्टर परिसर वेढून घेतला होता. आग विझविण्यासाठी वन अधिकारी व कर्मचारी शर्थीचे प्रयत्न करू लागले. परंतु आग आटोक्यात येत नसल्याने वरोरा नगरपालिकेच्या अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्नीशामक दलाच्या जवानांनी वरोरा चिमूर मार्गा लगतच्या जंगलातील आग विझविली. परंतु अग्नीशामक दलाचे वाहन जंगलात जात नसल्याने अग्नीशामक दलाचे प्रयत्न जंगलातील आग विझविण्यास निरर्थक ठरले. आगीमध्ये रोपवाटिकेतील रोपांना झळ पोहचली असून जंगलातील गावात व काही झाडेही आगीमध्ये सापडल्याने आगीमुळे वनविभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे मानले जात आहे. जंगलात वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असताना वनविभागाकडे आगीवर नियंत्रण मिळविण्याचे साहित्य अपुरे असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे घटनास्थळावर वनअधिकारी व कर्मचारी पोहचूनही आगीपासून जंगलाचा बचाव करता येत नसल्याचे या घटनेवरून दिसून आले. सालोरी मेसा जंगलातील आग तब्बल आठ तासानंतर आटोक्यात आली. (तालुका प्रतिनिधी)प्रति आग असफलआग जंगलात पसरत जावू नये, त्यामुळे आग लागल्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर प्रति आग लावली जाते. या प्रति आगीवर वनविभागाचे कर्मचारी आग वाढू नये म्हणून नियंत्रण ठेवून असतात. परंतु मेसा सालरी जंगलात आग लागल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व वन कर्मचाऱ्यांनी प्रति आग लावली. त्यावेळी जोरदार वारा असल्याने प्रति आग यशस्वी ठरली नाही.वन्यप्राण्यांचे स्थलांतरणसालोरी मेसा परिसरात एक वाघीण आपल्या तीन पिल्यासह वास्तव्यास आहे. वाघीण व पिल्लाचे दर्शन रस्ता ओलांडतांना अनेकांनी यापूर्वी घेतले आहे. यासोबत सालोरी परिसरात अनेकांनी पिल्लासह वाघिणीचे दर्शन घेतले. असे असताना याच परिसरात आग लागल्याने वाघीण व तिचे बछडे व अनेक वन्यप्राणी स्थलांतरीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वन्यप्राणी जंगलानजीकच्या गावात येण्याची भीती ग्रामस्थ बाळगून आहे.घटनेच्या दिवशी याच परिसरात रात्री दहा वाजेपर्यंत गस्त केली. तेव्हा आग दिसून आली नाही. ही आग पहाटे लागण्याची शक्यता असून आगीचे कारण शोधणे सुरू आहे. यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाई करू.- किशोर देऊळकरवनपरिमंडळ अधिकरी शेगाव (बु)