शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणामुळे पाच वर्षात ३४३ जणांचा मृत्यू

By admin | Updated: September 9, 2015 00:51 IST

प्रदूषणाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा देशात कुप्रसिध्द झाला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

परिस्थिती गंभीर : जिल्हा सामान्य रुग्णालयात मिळाले आकडेचंद्रपूर : प्रदूषणाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा देशात कुप्रसिध्द झाला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. प्रदूषणामुळे मागील पाच वर्षात तब्बल ३४३ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची बाब जिल्हा सामान्य रुग्णालयातून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या आकडेवारीवरून उजेडात आली आहे.सामाजिक कार्यकर्ता राजेश बेले यांनी ही माहिती मागितली होती. प्रदूषण दिवसेंदिवस आणखी वाढत असतानाही त्याला नियंत्रित करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येते. यासाठी व्यापक प्रमाणात वृक्षारोपण गरजेचे आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. वृक्षारोपण कार्यक्रमात हयगय केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राजेश बेले यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी ते पुढे म्हणाले, चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात आहे. मात्र या वृक्षांचे जतन व संवर्धन केले जात नाही. त्यामुळे लावलेले वृक्ष अल्पावधीतच नष्ट होऊन जातात. महानगरपालिकेने शहरातील रस्त्यावर लावलेले पाम ट्री त्याचेच उदाहरण आहे. जिल्ह्यात प्रदूषण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये विविध आजाराचे लक्षण दिसत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकडेवारीनुसार दमा, ह्दयविकार, अ‍ॅसीडीटी, त्वचा रोग, टीबी यासारखे आजारांमुळे २०११-१२ मध्ये ६६ जणांचा, २०१२-१३ मध्ये १०२ जणांचा, २०१३-१४ मध्ये ९० जणांचा, २०१४-१५ मध्ये ८५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अहवालामध्ये मृत्यूला कारणीभूत दूषित पाणी व वायू प्रदूषण ठरविण्यात आले आहे.वाढते प्रदूषण कमी करण्यात जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधीही बेजबाबदारपणा दाखवित असल्याचा आरोप बेले यांनी यावेळी केला. एकीकडे औद्योगिकरणाला चालना देण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला नियंत्रित करताना उदासीनता दाखविली जात आहे. सीटीपीएस चंद्रपुरात आहे. प्रदूषणाचा सामना चंद्रपूरकरांना करावा लागत आहे. तरीही विजेच्या वापरात सबसीडी दिली जात नाही, याबाबतही त्यांनी खंत व्यक्त केली. याबाबत संबंधित मंत्री, अधिकाऱ्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला स्वप्नील पटेल, सुदर्शन बोरीकर, फिरोज शेख, अमित रस्तोगी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)