शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळांना हव्या ३२६ नवीन वर्ग खोल्या

By admin | Updated: June 13, 2017 00:25 IST

२६ जूनपासून शाळेची पहिली घंटा वाजणार असून विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा सुरू होणार आहे.

नवीन शैक्षणिक सत्र तोंडावर : विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अडचणलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : २६ जूनपासून शाळेची पहिली घंटा वाजणार असून विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा सुरू होणार आहे. नवगतांचे स्वागत, पटनोंदणी पंधरवडा, गणवेश व पाठ्यपुस्तके वाटप असे नियोजन शिक्षण विभागाकडून सध्या सुरू आहे. मात्र अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्यांची कमरता आहे. वर्ग खोल्यांचे बांधकाम करण्याची मागणी गावकऱ्यांकडून सतत होत असतानाही याकडे जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. परिणामी नव्या शैक्षणिक सत्रातही अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना दोन वर्गाचे विद्यार्थी मिळून किंवा शाळा परिसरातील झाडाखाली, वऱ्हाड्यांत बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागणार आहे.जिल्हा परिषदेमार्फत सध्या स्थितीत १ हजार ५७२ प्राथमिक शाळा, २१ माध्यमिक शाळा व ३ जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा सुरू आहेत. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सद्य:स्थितीत ६ हजार ५२० वर्ग खोल्या आहेत. मात्र अजूनही नवीन ३२६ वर्ग खोल्यांची आवश्यकता आहे. गतवर्षी जिल्हा परिषदेच्या १ हजार ५७२ शाळांमध्ये १ लाख १५ हजार १७३ विद्यार्थी पटसंख्या तर २१ माध्यमिक शाळांमध्ये ४ हजार ९५७ व ३ उच्च माध्यमिक शाळांमध्ये २ हजार २०१ विद्यार्थी पटसंख्या होती. यावर्षी विद्यार्थी पटसंख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र वर्ग खोल्यांची अडचण शिक्षकांना अध्यापन प्रक्रियेत येत असल्याने अनेकदा दोन वर्गाच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवून किंवा शाळा परिसरातील झाडाखाली तसेच वऱ्हांड्यात बसवून शिक्षणाचे धडे द्यावे लागत आहे. शाळा व्यवस्थापन समित्यांमार्फत वर्ग खोली बांधकामासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र जिल्हा परिषद प्रशासन शाळांना नव्या वर्ग खोल्या बांधून देण्यास दिरंगाई करीत आहे. काही शाळांमध्ये नव्या वर्ग खोल्यांचे बांधकाम सुरू असून ते पुर्णत्वास आलेले नाही. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद प्रशासनाकडून ७५ वर्ग खोल्यांचे बांधकाम झाले होते. यामुळे काही शाळांमध्ये वर्ग खोल्यांचा प्रश्न मिटला. मात्र आजही ३२६ नव्या वर्ग खोल्यांची आवश्यकता आहे. अध्यापनावर परिणाम वर्गखोल्यांची कमतरता असल्यास अनेकदा दोन वर्गाच्या विद्यार्थ्यांना एकत्र किंवा शाळा परिसरातील झाडाखाली व वऱ्हाड्यांत बसवून धडे दिले जाते. मात्र अशावेळी विद्यार्थ्यांचे लक्ष अध्यापनात लागत नाही. तिथे घडणाऱ्या गोष्टी त्यांच्या नजरेत पडत असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष विचलीत होत असते. इमारती जीर्णअनेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी गळत असते. दरवर्षी डागडुजी करून वर्ग भरविले जातात. मात्र दरवर्षीच अशा समस्या उद्भवत असल्याने इमारतींची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.