जयंत जेनेकर
कोरपना : कायदा तसेच सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कोरपना येथे ३१ वषापूर्वी ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या ठाण्याअंतर्गंत चार बिट असून ६२ गावांचा कारभार पोलिसांवर आहे. या ३१ वर्षामध्ये तब्बल ३२ ठाणेदारांनी आपली सेवा देत येथील कायदा तसेच सुव्यवस्था सांभाळली.
परिसरात लक्ष ठेवण्यासाठी निजाम काळात शेरज बू. येथे पोलीस ठाणे होते. त्यानंतर त्याचे गडचांदूरला स्थानांतर करण्यात आले आणि कन्हाळगाव येथे पोलीस चौकी देण्यात आली होती. यादरम्यान गुन्ह्याचा वाढता आलेख बघता कोरपना येथे १९८९ ला पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. याला आज ३१ वर्षे पूर्ण झाले आहे.
सुरुवातीला अशपाक पटेल यांच्या वाड्यातून येथील ठाण्याचा कारभार चालायचा.२००० मध्ये वणी मार्गावर ठाण्याची स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक मधुकर पांडे यांच्या हस्ते पार पडले. ठाण्याच्या निर्मितीपासून १६ पोलीस निरीक्षक, सात सहाय्यक पोलीस निरीक्षक, नऊ पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी प्रमुख पदाचा कार्यभार सांभाळला. ठाण्याचे पहिले ठाणेदार एम. वी. बाकडे तर विद्यमान ठाणेदार अरुण गुरनुले आहे. सद्यस्थितीत ६२ गावे असून कोरपना , नारंडा, वनसडी, पारडी या चार बिटामचा समावेश आहे. पूर्वी या ठाणे हद्दीत जिवती तालुक्यातील येलापूर भागातील कोटापर्यंतची गावे समाविष्ट होती. मध्यतरी ती गावे कपात करण्यात आली. यामुळे आता पूर्वेस सोनुली, पश्चिम तेलंगणा राज्य सीमा, उत्तरेस यवतमाळ जिल्हा सीमा , दक्षिणेस सावलहिरा गाव पर्यंत ठाण्याची हद्द असून या अंतर्गत येणाऱ्या गावातील प्रत्येक हालचालींवर येथील कर्मचारी लक्ष ठेवून आहे.
यांनी दिली सेवा
पोलीस निरीक्षक दीपक देशपांडे, पी. पी. पाटील, सेवानंद तामगाडगे, जी. बी. यादव, नानाजी ठुसे, पी. पी. परदेशी, शोभाराव शेंडे, आर. एम. यादव, ए. डी. चौधरी, व्ही. डब्ल्यू. कुवर, अशोक कोळी, किसन शेळके , गजानन विखे पाटील , पी एस परघने, एन डी कोसुरकर , अरुण गुरणुले , साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे बी. एस. खोडके , एस. ए. शेख , अनिल किनगे, एस. के. वळवी , एस व्ही. भोसले, योगेश पारधी, मंगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे एम व्हीं बाकडे , बी बी सय्यद , पी एस धोटे , बी एम मोगल , यू. एम. सुखदेवे , आर ए वाघचौरे , जयेश भांडारकर, एस. एन. खैरनार, जे. झेड. वाळके आदींनी प्रमुख पदाचा कारभार सांभाळला.